Viral : फुड डिलीव्हरी ड्रोनवर कावळ्याचा हवेत हल्ला, पाहा हा व्हायरल व्हिडीओ

जगभरात ड्रोनचा वापर वाढत आहे. शूटिंगपासून सुरक्षेपर्यंत सर्वत्र याचा वापर केला जात आहे. ड्रोन सामान्यतः पक्ष्यांसाठी धोकादायक मानले जातात. तज्ञांच्या मते, पक्षी ड्रोनच्या आवाज आणि पंखांमुळे घाबरतात. असेच काहीसे अलीकडच्या काळातही समोर आले आहे.

Viral : फुड डिलीव्हरी ड्रोनवर कावळ्याचा हवेत हल्ला, पाहा हा व्हायरल व्हिडीओ
Crow attack on drone


मुंबई : जगभरात ड्रोनचा वापर वाढत आहे. शूटिंगपासून सुरक्षेपर्यंत सर्वत्र याचा वापर केला जात आहे. ड्रोन सामान्यतः पक्ष्यांसाठी धोकादायक मानले जातात. तज्ञांच्या मते, पक्षी ड्रोनच्या आवाज आणि पंखांमुळे घाबरतात. असेच काहीसे अलीकडच्या काळातही समोर आले आहे.

हे प्रकरण ऑस्ट्रेलियाचे आहे, जेथे फुड डिलीव्हरी करणाऱ्या ड्रोनवर कावळ्याने हल्ला केला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ या आठवड्याचा असल्याचे सांगितले जात आहे. ड्रोन हवेत उडताना पाहून कावळ्याने त्यावर हल्ला केला. त्यानंतर असे काही घडले की पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबद्दल सांगितले जात आहे की एका ग्राहकाने एअर डिलीव्हरीद्वारे त्याच्या जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यानंतर तो त्यांच्या ऑर्डरची वाट पाहत होता की त्याने खिडकीतून पाहिले की एका कावळ्याने त्याच्या घरी येणाऱ्या ड्रोनवर हल्ला केला.

पाहा व्हिडीओ –

कावळा वारंवार त्याच्या चोचीने ड्रोनवर हल्ला करत होता. मात्र, जेव्हा त्याच्या लक्षात आले की ड्रोनमुळे त्याच्या हल्ल्यात काही फरक पडत नाही, तेव्हा तो तेथून पळून गेला. यावेळी उपस्थित व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण टिपण्यात यशस्वी झाली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली आणि लिहिले, ‘या प्रकारची सेवा सुरु करण्यापूर्वी आपण अशा निकालासाठी तयार असले पाहिजे.’ या व्हिडीओला कॅप्शन देताना दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘CROW VS DROWN.’ याशिवाय, आणखी बऱ्याच वापरकर्त्यांकडे यावर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली.

‘विंग’ च्या भागीदारीत गुगलने ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरामध्ये एअर डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे. ज्यामध्ये ड्रोन डिलिव्हरीमध्ये कॉफी, अन्न, औषध आणि हार्डवेअर वस्तूंचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

पाय नसलेलं धड, पण अवघ्या 4 सेकंदात सगळं बदललं, तरुणाची जगभरात एकच चर्चा !

Video: ताडोबात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल, लोक व्हिडीओ पाहूनच घाबरले!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI