Video: ताडोबात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल, लोक व्हिडीओ पाहूनच घाबरले!

वाघ दिसल्यानंतर पर्यटक लगेच मोबाईल वा कॅमेरा काढतात, आणि त्याचं चित्रिकरण करायला लागतात. आपल्या मेमरीत हे कायमचं राहावं अशी लोकांची इच्छा असते.

Video: ताडोबात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल, लोक व्हिडीओ पाहूनच घाबरले!
व्हिडिओमध्ये वाघ रस्ता ओलांडताना दिसतो.

आजच्या काळात वाघ काय सहज दिसत नाहीत. म्हणूनच लोकांना जंगल सफारीवर जायला आवडते. जिथं लोकांना वाघ, सिंह आणि बिबट्या पाहण्याची संधी मिळते. वाघ दिसल्यानंतर पर्यटक लगेच मोबाईल वा कॅमेरा काढतात, आणि त्याचं चित्रिकरण करायला लागतात. आपल्या मेमरीत हे कायमचं राहावं अशी लोकांची इच्छा असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात वाघ रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ( Video of a tiger walking in the Tadoba Tiger Reserve)

व्हायरल होणारा व्हिडिओ IFS अधिकारी मधु मिठा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- ‘ ज्याने जंगलातला वाघ पाहिला असेल, त्याला हा व्हिडीओ पाहिल्यावर भीती वाटेल, पण महाराष्ट्राच्या ताडोबामधील हे एक समान दृश्य आहे आणि हो, वाघच पाहू नका, पाठीमागून येणाऱ्या सांभार आणि हरणांचे आवाजही ऐका’

पाहा व्हिडीओ:

व्हिडिओमध्ये वाघ रस्ता ओलांडताना दिसतो. तो हळू हळू एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात आहे. त्याला समोर माणूस आहे की अजून कोण, याच्याशी काहीही देणंघेणं नाही. तो जंगलाचा राजाच आहे, हे इथं दाखवून देत आहे. या दरम्यान, रस्त्यावर एक कार देखील उभी आहे, ज्यात काही लोक बसलेले आहेत आणि ते वाघाचा व्हिडिओ शूट करत आहेत. व्हिडीओमधील एक मनोरंजक गोष्ट म्हणजे वाघ गाडी आणि त्या लोकांकडे चांगले दुर्लक्ष करतो आणि जंगलाच्या दिशेने जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत 17 हजार वेळा पाहिला गेला आहे.

हेही पाहा:

 

Video: ‘शेअरिंग इज केअरिंग’ हे या चिमुरड्याला कळतं, आपल्याला कधी कळणार, मांजरीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Video: नंदी सिस्टरने वेगळ्या अंदाजात गायलं मणिके मगे हिते गाणं, लोक म्हणाले, या गाण्याची जादूच वेगळी आहे!

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI