AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘शेअरिंग इज केअरिंग’ हे या चिमुरड्याला कळतं, आपल्याला कधी कळणार, मांजरीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा, आपलं जेवण मांजरीला देताना दिसत आहे.

Video: 'शेअरिंग इज केअरिंग' हे या चिमुरड्याला कळतं, आपल्याला कधी कळणार, मांजरीसोबतचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर या मुलाचं आणि त्याचा पालकांचं कौतुक केलं जात आहे.
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 4:47 PM
Share

लहान मुलं काय करतील, त्याचा नेम नाही. सोशल मीडियावरही लहान मुलांचे असे व्हिडीओ शेअर होत असतात. ज्या मुलं वेगवेगळ्या करामती करतात. लहान मुलांचे हे व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा, आपलं जेवण मांजरीला देताना दिसत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे. लहान मुलगा करत असलेल्या या भूतदयेचं श्रेय नेटकरी त्याच्या पालकांच्या संस्कारांना देत आहेत. ( The little boy feeds the hungry cat his food. The video went viral )

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मूल काहीतरी खात आहे, त्याचवेळी एक मांजर मुलाजवळ येऊन बसते. मुलगा त्या मांजरीकडे पाहतो, आणि विचार करतो. नंतर आपल्या हातातील खाद्यपदार्थ त्या मांजरीजवळ घेऊन जातो. ज्यावेळी हा खाद्यपदार्थ त्या मांजरीला देत असतो, त्यावेळी मांजर दुसरीकडे पाहात असते, त्यामुळे आधी ती थोडी घाबरते. नंतर तिलाही कळतं की, हा चिमुकला तिला खायला देत आहे. त्यानंतर ती मांजर थोडी शांत होते आणि खायला लागते. ज्या वयात काय खायचं हेही कळत नाही, त्या वयात हा चिमुरडा प्राण्यांवर प्रेम करतो आहे. प्राण्याचं महत्त्व त्याला याही वयात कळतं आहे. सोशल मीडियावर या मुलाचं आणि त्याचा पालकांचं कौतुक केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडिओ प्रत्येकाची मनं जिंकत आहे. लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. अवघा 18 सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. Buitengebieden या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘शेअरिंग इज केअरिंग .. ️’ असं लिहण्यात आलं आहे.

यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आपण माणूस म्हणून प्राण्यांवरही प्रेम करण्याची गरज आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘किती चांगल्या मनाचा मुलगा. त्याच्या पालकांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. अशा मुलांमुळेच पृथ्वी राहण्याजोगा ग्रह वाटतो ‘या व्यतिरिक्त, एकाने लिहिले,’ काही लोक इमोजीज शेअर करुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही पाहा:

Video: नंदी सिस्टरने वेगळ्या अंदाजात गायलं मणिके मगे हिते गाणं, लोक म्हणाले, या गाण्याची जादूच वेगळी आहे!

Video | लग्नाच्या दिवशीच म्हणते ‘तेरे लिये दुनिया छोड दी है,’ नवरीने गायलेलं गाण व्हायरल

 

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.