पाय नसलेलं धड, पण अवघ्या 4 सेकंदात सगळं बदललं, तरुणाची जगभरात एकच चर्चा !

जिओन क्लार्क या तरुणाने तर थेट वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. कंबरेच्या खालचा भाग नसलेल्या क्लार्कने इच्छाशक्तीच्या जोरावर ही किमया करून दाखवली आहे. त्याने अवघ्या 4.78 सेकंदात आपल्या हाताने तब्बल 20 मीटर अंतर पार केले आहे.

पाय नसलेलं धड, पण अवघ्या 4 सेकंदात सगळं बदललं, तरुणाची जगभरात एकच चर्चा !
दोन्ही पाय नसतानाही क्लार्कने किमया करुन दाखवली आहे.

मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेक अपंग, दिव्यांग व्यक्ती असतात. कोणाला हात नसतो तर कोणाला पाय नसतो. एखादा अवयव नसल्यामुळे या लोकांना किती अडचणी येत असतील याची कल्पनासुद्धा आपण केलेली नसते. काही दिव्यांग लोकांची परिस्थिती तर अतिशय दयनिय असते. मात्र, या जगात असेदेखील काही लोक आहेत, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत यशाची शिखरं गाठली आहेत. जिओन क्लार्क या तरुणाने तर थेट वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. कंबरेच्या खालचा भाग नसलेल्या क्लार्कने इच्छाशक्तीच्या जोरावर ही किमया करून दाखवली आहे. त्याने अवघ्या 4.78 सेकंदात आपल्या हाताने तब्बल 20 मीटर अंतर पार केले आहे. (half body man created world record of walking 20 meters distance in 4 second)

जिओन क्लार्कचे वर्ल्ड रेकोर्ड

जिओन क्लार्कचे वय 23 वर्षे आहे. त्याने नुकताच एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने आपल्या हातांनी वीस मीटरपर्यंतचे अंतर फक्त 4.78 सेकंदांमध्ये पार केले आहे. जिओन क्लार्क अमेरिकेतील एक अॅथलिट आहे. तसेच तो मोटीवेशनल स्पीकर म्हणूनदेखील काम करत असून त्याला लिखानाची आवड आहे.

लहानपणीच कॉडल रिग्रेशन सिंड्रोम नावाचा आजार

जिओन क्लार्कने केलेले वर्ल्ड रेकॉर्ड, त्याची मेहनत तसेच त्याच्या भूतकाळाविषयी माहिती यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसीनने दिली आहे. क्लार्क हा जन्मापासूनच अपंग आहे. त्याला दोन्ही पाय नाहीत. कॉडल रिग्रेशन सिंड्रोम नावाचा आजार त्याला आहे. पण लहानपणापासूनच पाय नसल्यामुळे तो हिम्मत हरला नाही. त्याने जिद्दीने आपल्या सर्व कमकुवत बाजूंवर मात केली. त्याच्या याच जिद्दीच्या जोरावर पाय नसूनदेखील तो शालेय जिवनात पैलवान होता. आपल्या शाळेतील जीममध्ये जाऊन त्याने पिळदार देहयष्टी मिळवली.

4.78 सेकंदात क्लार्कने वीस मीटर अंतर पार केले 

जिओन क्लार्कने केलेल्या रेकॉर्डविषयी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त 4.78 सेकंदात क्लार्कने वीस मीटर अंतर पार करण्याची किमया साधली आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने हा रेकॉर्ड केला होता. या आठवड्यात त्याला मान्यता देण्यात आली आहे.

म्हणतो मुलांना प्रोत्साहित करायचे आहे

दरम्यान, हा रेकॉर्ड़ स्थापित केल्यानंतर क्लार्कने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे जे काही मिळाले आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. प्रत्येक मुलाला प्रोत्साहित करण्याचे माझे ध्ये आहे. मुलांना जे काही व्हायचे आहे, त्यासाठी मला मुलांना प्रोत्साहित करायचे आहे. . आयुष्यात कोणालाही तुम्ही आमुक गोष्टी करु शकत नाही, हे म्हणण्याची परवानगी देऊ नका, असे क्लार्कने म्हटले आहे.

इतर बातम्या :

Video | शिकार करण्यासाठी मगर धावली, पिल्लाचा जीव चावण्यासाठी हरिणीचा त्याग, व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक

Video: ताडोबात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल, लोक व्हिडीओ पाहूनच घाबरले!

Video: नंदी सिस्टरने वेगळ्या अंदाजात गायलं मणिके मगे हिते गाणं, लोक म्हणाले, या गाण्याची जादूच वेगळी आहे!

(half body man created world record of walking 20 meters distance in 4 second)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI