Video | तरुणांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमधून चालवली स्कुटी, अन् बघता बघता चटणी तयार, मजेदार व्हिडीओची चर्चा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 26, 2021 | 1:05 AM

व्हिडीओमध्ये दोन मुलांनी मिक्सरचा वापर न करता चक्क चटणी तयार केली आहे. त्यांनी वापरलेला फॉर्म्यूला पाहून भलेभले चक्रावले आहेत.

Video | तरुणांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमधून चालवली स्कुटी, अन् बघता बघता चटणी तयार, मजेदार व्हिडीओची चर्चा
viral video

Follow us on

मुंबई : आपल्या देशातील रस्त्यांची चर्चा विदेशातसुद्धा होते. रस्त्यांवरील खड्डे, खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी असे अनेक व्हिडीओ आपण रोजच पाहतो. रस्ते अपघातामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्यासुद्धा आपल्याकडे कमी नाही. सध्या याच रस्त्यांची दशा दाखवणारा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून सरकारवर टीका केली आहे. (young boy prepare chutney with the help of potholes funny video went viral on social media)

मिक्सरचा वापर न करता तयार केली चटणी 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुलांनी मिक्सरचा वापर न करता चक्क चटणी तयार केली आहे. त्यांनी वापरलेला फॉर्म्यूला पाहून भलेभले चक्रावले आहेत.

तरुणांनी खड्ड्यांमधून चालवली स्कुटी, चटणी तयार

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन मुलांनी मिक्सरच्या भांड्यामंध्ये चटणीसाठी लागणारे सर्व मसाले तसेच मिरच्या टाकल्या आहेत. नतर मिक्सरचा वापर करण्याऐवजी ते थेट स्कुटीवर बसले आहेत. तसेच खड्डे असलेल्या रस्त्यावर ते स्कुटी चालवत आहेत. खड्डे तसेच रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढत दोघे स्कुटी चालवत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोन्ही तरुण हेलकावे खात आहेत. तसेच तरुण हेलकावे खात असताना मिस्करच्या भांड्यामधील मसाला आणि मिरच्यासुद्धा मिक्स होत आहेत. नंतर स्कुटी थांबवून पाहतात तर मस्तपैकी चटणी तयार झालेली असते.

पाहा व्हिडीओ :

रस्त्यांची दुर्दशा सांगण्यासाठी तयार केला व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ मुळात रस्त्यांची जी दुर्दशा झालेली आहे, त्यावर टीका करणारा आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मिक्सरचा वापर न करताही चटणी तयार होऊ शकते, असे या व्हिडीओमध्ये उपहासात्मपणे सांगण्यात आल आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून काहींनी त्याला उत्स्फूर्तपणे शेअर केले आहे.

इतर बातम्या :

Video | तहानलेल्या कुत्र्याची पाण्यासाठी वणवण, नळाजवळ येताच माणसाने ओंजळ समोर केली, व्हिडीओ व्हायरल

सांगलीच्या भंगारातील खुर्ची थेट इंग्लंडच्या कॅफेत ! मंडपवाल्या बाळू लोखंडेची एकच चर्चा, गमतीदार प्रवास नेमका कसा झाला ?

सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतोय एक्सेंट चॅलेंज, मिस्टर आणि मिसेस नेनेंचा व्हिडीओ व्हायरल

(young boy prepare chutney with the help of potholes funny video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI