Video viral : ‘या’ महाभागाला पाहा; पोलिसांना एकवेळ चकवा देईल, पण यमराजाला..?

Video viral : 'या' महाभागाला पाहा; पोलिसांना एकवेळ चकवा देईल, पण यमराजाला..?
दुचाकीवर पाच जणांना घेऊन प्रवास करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली
Image Credit source: Twitter

Traffic rules violation : सोशल मीडियावर (Social media) वाहतुकीचे नियम तोडण्याचा (Traffic rules violation) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाच जण स्कूटीवरून प्रवास करताना दिसत आहेत.

प्रदीप गरड

|

Mar 28, 2022 | 12:41 PM

Traffic rules violation : सोशल मीडियावर (Social media) वाहतुकीचे नियम तोडण्याचा (Traffic rules violation) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाच जण स्कूटीवरून प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका आयपीएस अधिकाऱ्याने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की तुम्ही पोलिसांना चकमा देऊ शकता, पण यमराजाला नाही. ज्या स्कूटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या स्कूटीमध्ये एक-दोन नव्हे तर पाच जण स्वार झालेले पाहायला मिळत आहेत. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. स्कूटी रायडरचा व्हिडिओ शेअर करत IPS दीपांशु काबरा यांनी लिहिले, की मोठा झाला म्हणून काय झाले, हा ड्रायव्हर मूर्ख आहे. याला सुरक्षेची कोणतीही पर्वा नाही.

‘मुलांना चुकीचे शिकवू नका’

मोठ्यांनी आपले अज्ञान किंवा चुकीच्या गोष्टी निष्पाप मुलांना शिकवू नये. काही क्षणांसाठी तुम्ही पोलिसांना चकवा द्याल, यमराजाला नाही. विशेष म्हणजे, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटी चालवत आहे. मुले शाळेच्या ड्रेसमध्ये मागे बसलेली आहेत. एक स्कूटी, ज्यावर दोन लोक बसू शकतात, त्यावर पाच जणांना घेऊन जाताना दिसत आहे. मागच्या सीटवर एक मूल उभे दिसत आहे. साहजिकच असा प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. या व्हिडिओवर यूझर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘मुलांचा तरी विचार करायला हवा’

एका यूझरने सांगितले, की कारवाई निःसंशयपणे केली पाहिजे, तसेच जागरूक करणे जास्त योग्य असेल. तर दुसर्‍या यूझरने लिहिले, की कुटुंबाला असा धोका पत्करणे मूर्खपणाचे आहे. दुसर्‍या यूझरने लिहिले, की तो एक मोठा चालक असेल, पण किमान मुलांचा तरी विचार करायला हवा. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट होत नाही, की ही घटना कुठे घडली आहे?

आणखी वाचा :

सॅलड खाण्याची स्पर्धा तीही सशांबरोबर! कोण जिंकलं? भन्नाट Challenge video पाहाच

Video : आता तर हद्द झाली! Kacha Badamनंतर आणखी एक गाणं सोशल मीडियावर Viral

कुत्र्यानं असं काही पळवलं, की धाडकन् कारला जाऊन आदळला; Funny video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें