Dog funny video : जर लोक जगातील कोणत्याही प्राण्याला सर्वात जास्त पाळत असतील तर तो कुत्रा आहे. माणूस त्यांच्याशी इतका जोडला गेला आहे, की त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. कुत्र्यांचेही असेच आहे. तेही माणसांच्या सहवासाशिवाय राहू शकत नाहीत. काही कुत्रे रस्त्यावरचे असले तरीही त्यांना माणसांशी ओढ असते. रस्त्यावरच्या कुत्र्यांशी तुमचा रोज संपर्क होत असतो. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की काही कुत्रे बाइक किंवा कारने जाणाऱ्या लोकांवर भुंकतात आणि कधी कधी त्यांच्या मागेही धावू लागतात. कारमधल्यांना तर भीती नसते, पण बाइकवरून जाणाऱ्यांना मात्र कधीकधी आपटण्याची वेळ येते. सोशल मीडियावर (Social media) हजारो प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असतात, ज्यामध्ये कुत्र्यांशी संबंधित मजेदार व्हिडिओ असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक माणूस मोटरसायकलवरून येत आहे, तेव्हा एक कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागतो, ज्यामुळे तो खूप घाबरतो आणि बाइक जरा वेगाने चालवू लागतो. दरम्यान, कुत्राही त्याच्यामागे धावू लागतो, त्यामुळे ती व्यक्ती चांगलीच घाबरते आणि कुत्र्याला पाहताच तो पुढे रस्त्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि बाजूला उभ्या असलेल्या कारला धडकतो. तो तिथे पडतो. त्याचवेळी भुंकणारा कुत्रा माणूस पडलेला पाहून तिथून निघून जातो.
View this post on Instagram
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर cutepuppy542 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 60 दशलक्ष म्हणजेच 60 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर 2.3 दशलक्ष म्हणजेच 23 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आपले हसू आवरणार नाही, हे नक्की…