VIDEO : गडचिरोलीमधील पट्टेदार वाघाचा रस्ता ओलांडतांनाचा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

VIDEO : गडचिरोलीमधील पट्टेदार वाघाचा रस्ता ओलांडतांनाचा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
गडचिरोलीमधील रस्ता ओलांडतानाचा वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Image Credit source: TV9

तालुक्यातील मुरमुरी गावात सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांवर वाघानं हल्ला (Attack) केला होता. आता गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा मार्गावरील एका पट्टेदार वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा वाघ जंगलातून निघून राष्ट्रीय महामार्ग ओलांडतांना दिसला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 27, 2022 | 10:21 AM

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात सध्या वाघाची आणि बिबट्याची (Tiger) प्रचंड दहशत आहे. काही दिवसांपूर्वी देसाईगंज अरमोरी चार्मोशी तालुक्यात तर वाघाने धुमाकूळ घातला होता. याच तालुक्यातील मुरमुरी गावात सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांवर वाघानं हल्ला (Attack) केला होता. आता गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा मार्गावरील एका पट्टेदार वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा वाघ जंगलातून निघून राष्ट्रीय महामार्ग ओलांडतांना दिसला आहे.

वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विशेष म्हणजे रेकाॅर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये पट्टेदार वाघ चांगलाच रागात दिसतो आहे. हा वाघ मोठा आवाज करत घनदाट जंगलातून महामार्गावर आला आणि परत रस्ता ओलांडत जंगलात गेला. काही शेकंदांचा हा व्हिडीओ आहे, मात्र तो बघताना अंगावर काटा नक्कीच येतो. हा व्हिडीओ काल रात्रीपासून चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतो आहे. गडचिरोली जिल्ह्यात या अगोदर पट्टेदार वाघाने खूप दहशत घातली होती. पट्टेदार वाघाच्या दहशदीमुळे ग्रामीन भागातील लोक तर रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर येणे देखील टाळत होते.

इथे पाहा वाघाचा व्हायरल होणारा व्हिडीओ 

देसाईगंज आरमोरी या दोन तालुक्यातील काही लोकांवर पट्टेदार वाघाने हल्ला देखील केला होता. तर काही पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. आता हा व्हायरल होणार व्हिडीओ बघितल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न येतो आहे की, दहशत पसरवणारा हाच तो पट्टेदार वाघ आहे? मुरमुरी गावात आणि चार्मोशी तालुक्यातही पट्टेदार वाघाने चांगलीच दहशत निर्माण केली होती. त्यावेळी वन विभागाने ताबडतोब या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. हा व्हायरल होणारा व्हिडीओ रात्रीच्या वेळीचा आहे. ज्यांनी हा व्हिडीओ रिकाॅर्ड केला आहे. ते चारचाकी गाडीमध्ये असल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे यांच्या अगदी जवळूनच हा वाघ गेल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसते आहे.

संबंधित बातम्या : 

Viral video : महिला घेत होती उंटासोबत सेल्फी, मग असं काही झालं की…, पाहा उंटाने नेमकं काय केलं?

VIDEO : कमालच झाली! मोठी शिकार जबड्यात, बिबट्या तरतर चढला झाडावर….पाहा थक्क करणारा व्हिडीओ


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें