VIDEO : कमालच झाली! मोठी शिकार जबड्यात, बिबट्या तरतर चढला झाडावर….पाहा थक्क करणारा व्हिडीओ

VIDEO : कमालच झाली! मोठी शिकार जबड्यात, बिबट्या तरतर चढला झाडावर....पाहा थक्क करणारा व्हिडीओ
बिबट्याचा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Image Credit source: TV9

सोशल मीडियावर (Social media) दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात की, ते पाहिल्यावर आपला स्वत: च्या डोळ्यांवर देखील विश्वास राहात नाही. लोकांना देखील प्राण्यांचे अजब गजब व्हिडीओ (Video) बघायला प्रचंड आवडते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 26, 2022 | 11:09 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात की, ते पाहिल्यावर आपला स्वत: च्या डोळ्यांवर देखील विश्वास राहात नाही. लोकांना देखील प्राण्यांचे अजब गजब व्हिडीओ (Video) बघायला प्रचंड आवडते. सोशल मिडीयावर काही लोक वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच असाच एक बिबट्याचा (Leopard) व्हिडिओ समोर आला आहे. हा बिबट्याचा व्हिडीओ अत्यंत थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे व्हायरल झाल्यापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो आहे.

बिबट्याचा झाडावर चढतानाचा व्हिडीओ व्हायरल

बिबट्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका बिबट्याने मोठ्या प्राण्याची शिकार केली आहे. त्यानंतर तो बिबट्या आपल्या शिकारीला झाडावर घेऊ चढतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. बिबट्या शिकार करण्यात एकदम माहीर प्राणी आहे. जेव्हा जेव्हा बिबट्या एखाद्या प्राण्याची शिकार करतो तेव्हा तो झाडावर चढतो आणि तिथे जाणून केलेली शिकार खातो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, बिबट्या आपल्या शिकारीला जबड्यात पकडून झाडावर चढतो आहे.

इथे पाहा बिबट्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ

wild animal shorts नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडिओला 1 लाख 23 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला धक्का बसला आहे’. अनेकदा बिबट्या एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर झाडावर घेऊन जातात आणि झाडावर बसून खातात. कारण त्यांनी केलेली शिकार इतर प्राण्यांनी खाऊ शकतात. मात्र, व्हायरल होणाऱा व्हिडीओ पाहून आपल्या लक्षात येईल की, बिबट्यामध्ये किती जास्त ताकद असते.

संबंधित बातम्या : 

VIDEO : खतरनाक स्टंट करण्याच्या नादामध्ये तरूण आपटला, नेटकरी म्हणाले की…

Video : ‘अरे भई निकल के आ घर से, आ घर से…’ का Viral होतंय हे गाणं? हर्ष गोयंकांनीही केलंय Tweet


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें