VIDEO : खतरनाक स्टंट करण्याच्या नादामध्ये तरूण आपटला, नेटकरी म्हणाले की…

VIDEO : खतरनाक स्टंट करण्याच्या नादामध्ये तरूण आपटला, नेटकरी म्हणाले की...
तरूणाचा स्टंट करतानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
Image Credit source: TV9

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके जास्त मजेदार असतात की, ते पाहिल्यावर आपल्याला हसू आल्याशिवाय रहात नाही. तर काही व्हिडीओंना (Video) पाहून तर आपण थक्क होऊन जातो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 26, 2022 | 10:20 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके जास्त मजेदार असतात की, ते पाहिल्यावर आपल्याला हसू आल्याशिवाय रहात नाही. तर काही व्हिडीओंना (Video) पाहून तर आपण थक्क होऊन जातो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ लोक आवडीने पाहतात. मात्र, सोशल मीडियावर प्रसिध्द होण्यासाठी अनेक तरूण आपला जीव धोक्यात घालून स्टंट (Stunts) करण्याचा प्रयत्न देखील करतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

स्टंट करणारा तरूण कोमात…,नेटकरी जोमात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण मैदामामध्ये स्लाइड मारण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो निसरड्या जमिनीवर आपल्या स्केट बोर्डच्या मदतीने येतो. मात्र, अचानक त्याचा तोल जातो आणि धडकन जमिनीवर जोरात पडतो. आजकाल लोकांमध्ये स्टंट करण्याची खूप क्रेझ आहे. अनेक वेळा लोक असे स्टंट करताना आपला जीव देखील गमावतात. यामुळे लोकांना दाखवण्यासाठी आणि प्रसिध्द होण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून स्टंट करणे चूकीचे आहे.

इथे पाहा तरूणाचा स्टंटचा व्हायरल होणारा व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर adrenalineblast नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला असून तो चार दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला. या व्हिडीओला 9 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले की, ‘खरतर स्टंट करताना लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत’.

संबंधित बातम्या : 

Video : ‘अरे भई निकल के आ घर से, आ घर से…’ का Viral होतंय हे गाणं? हर्ष गोयंकांनीही केलंय Tweet

स्पायडर मॅनच्या मागे लागलाय जोकर, Challenge होईल पूर्ण; पाहा Viral video


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें