Video : ‘अरे भई निकल के आ घर से, आ घर से…’ का Viral होतंय हे गाणं? हर्ष गोयंकांनीही केलंय Tweet

Work from home memes : कोविड महामारीने सगळ्यांचेच कंबरडे मोडले. ऑफिसेसनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगितले. याचविषयावर एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी शेअर केला आहे.

Video : 'अरे भई निकल के आ घर से, आ घर से...' का Viral होतंय हे गाणं? हर्ष गोयंकांनीही केलंय Tweet
न्यू दिल्ली (1956) चित्रपटातील एका गाण्यात किशोर कुमारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 8:30 AM

Work from home memes : कोविड महामारीने आपल्या सगळ्यांचेच कंबरडे मोडले. मागच्या दोन वर्षांपासून आपण कोविडशी सामना करत आहोत. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. लसीकरण झाल्यामुळे काही प्रमाणात कोविडची बाधा फिकी पडू लागली आहे. आधी जनता कर्फ्यू, मग अनेक बंधने आपण पाळली. घराबाहेर पडताना काळजी घेण्याच्या सरकारने सूचना केल्या. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. आता इतरांशी संपर्क नको म्हणून अनेक ऑफिसेसनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगितले. खरे तर कोविडनंतर घरून काम करण्याचा ट्रेंडच आला असे म्हणायला हवे. कोविड आता कमी झाला असला तरी कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांनी घरून काम करणे फायद्याचे ठरत आहे. पण काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत आहे. याचविषयावर एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

ट्विटरवर शेअर

हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटरवर किशोर कुमारांच्या सिनेमातले एक गाणे ट्विट केले आहे. न्यू दिल्ली या 1956 साली रिलीज झालेल्या सिनेमातले हे गाणे आहे. ‘Arey Bhai Nikal Ke Aa Ghar Se‘ असे या गाण्याचे बोल आहेत. आता हे गाणे आणि गोयंका यांचे ट्विटही व्हायरल झाले आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे गाणे व्हायरल होत असून गोयंका यांनी म्हटले आहे, की सर्व ऑफिसेस त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे इन्व्हिटेशन पाठवत आहेत.

अनेकजण घरीच रमले

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून यूझर्स यावर रिअॅक्ट होत आहेत. अनेकजण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मीम्स शेअर करून आता आम्ही वर्क फ्रॉम होममध्येच रमलो असल्याचे अनेकजण म्हणत आहेत. काही जण म्हणत आहेत, आम्हाला आमिष दाखवले जात आहे. तर काही जण हा एक उत्तम मेसेज असल्याचे म्हणत आहेत.

आणखी वाचा :

Video : एवढंसं पोरगं, पण कसलं नाचतंय… आफ्रिकन मुलाच्या जबराट Dance moves viral

Video : …जेव्हा दोन क्रूर शिकारी एकमेकांसमोर येतात; बिबट्याला टक्कर देण्यासाठी Black panther झाडावर!

रामकली को हो गया भोलू से प्यार..; 39 वर्ष लहान असलेल्या तरुणासोबत Live in relationshipमध्ये राहतेय महिला

Non Stop LIVE Update
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय.
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?.
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार.
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.