AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : …जेव्हा दोन क्रूर शिकारी एकमेकांसमोर येतात; बिबट्याला टक्कर देण्यासाठी Black panther झाडावर!

Wild animals video : कधी-कधी भक्षक प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) समोर येतात. अलीकडे असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. ज्यामध्ये बिबट्या (Leopard) आणि ब्लॅक पँथर (Black panther) एकत्र लढताना दिसत आहेत.

Video : ...जेव्हा दोन क्रूर शिकारी एकमेकांसमोर येतात; बिबट्याला टक्कर देण्यासाठी Black panther झाडावर!
जंगलात समोरासमोर आले बिबट्या आणि ब्लॅक पँथरImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 25, 2022 | 1:12 PM
Share

Wild animals video : जंगलाच्या दुनियेत एक वेगळाच कायदा असतो. जंगलाचा कायदा मारा किंवा मरा यावरच चालतो. कधी-कधी भक्षक प्राण्यांचे असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) समोर येतात, जे पाहून सोशल मीडिया यूझर्स आश्चर्यचकित होतात. अलीकडे असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. ज्यामध्ये बिबट्या (Leopard) आणि ब्लॅक पँथर (Black panther) एकत्र लढताना दिसत आहेत. खरेतर, हे दोन्ही शिकारी जंगलातील सर्वात क्रूर शिकारींमध्ये गणले जातात, जे त्यांच्या शिकारीला पळून जाण्याची संधीदेखील देत नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा ते एकमेकांशी भिडतात तेव्हा काय होत असेल? असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ब्लॅक पँथर अतिशय वेगाने झाडावर चढत असताना एक बिबट्या त्याची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकमेकांकडे टक लावून पाहतात

झाडावर चढल्यानंतर हे शिकारी एकमेकांकडे टक लावून पाहतात, असे की जणू ते एकमेकांना खातील. पण यादरम्यान त्यांच्यात कसलीही बाचाबाची होत नाही आणि काही वेळाने ब्लॅक पँथर झाडावरून खाली येतो. हा एक मिनिटाचा व्हिडिओ जंगल सफारीदरम्यान शूट करण्यात आला आहे. जो सौरभ गुप्ता नावाच्या यूझरने शेअर केला आहे. त्याला 18 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1100हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यासोबतच लोक ते पाहून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘पहिल्यांदा पाहिलं एकत्र’

सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. एका यूझरने सांगितले, की मी Wowww Black Panther आणि Leopard या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिले. त्याचवेळी दुसऱ्या यूझरने लिहिले, की ब्लॅक पँथर जरा लाजाळू आहे पण बिबट्याचे असे वागणे पाहून मला आश्चर्य वाटत आहे. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

‘या’ देशी स्पायडरमॅनला पाहिलं का? चिखल आणि पाणीही याचा रस्ता रोखू शकलं नाही, Jugaad video viral

बाजूला चित्ता असूनही घाबरत नाही हरीण, काय कारण? पूर्ण पाहा ‘हा’ Viral video

म्हशीशी सामना करणं सिंहाला पडलं भारी! जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, Video viral

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं