म्हशीशी सामना करणं सिंहाला पडलं भारी! जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, Video viral

Wild animals video : सिंह (Lion) एका क्षणात आपली शिकार करतो. त्याची एक गर्जना ऐकून जंगलातील सर्व प्राणी पळून जातात. याउलट, सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये सिंह दोन शिंगे असलेल्या म्हशीसमोर जीव वाचवताना दिसत आहे.

म्हशीशी सामना करणं सिंहाला पडलं भारी! जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, Video viral
म्हैस मागे लागल्याने स्वत:चा जीव वाचवताना सिंह
Image Credit source: Instagram
प्रदीप गरड

|

Mar 24, 2022 | 6:20 PM

Wild animals video : सिंह (Lion) एका क्षणात आपली शिकार करतो. त्याची एक गर्जना ऐकून जंगलातील सर्व प्राणी पळून जातात. सिंह पाण्यात घुसून धोकादायक मगरीची शिकार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा पाहिला असेल. याशिवाय भयानक गेंड्यांपासून ते उंच जिराफापर्यंत सिंह आपल्या तीक्ष्ण दातांनी क्षणार्धात शिकार करतो. याउलट, सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये सिंह दोन शिंगे असलेल्या म्हशीसमोर जीव वाचवताना दिसत आहे. जिथे सिंहासमोर मोठमोठे प्राणी आपला मार्ग बदलतात, तर दोन शिंगे असलेली म्हैस सिंहाला मारण्यासाठी आतुरलेली दिसते. या म्हशीसमोर जंगलाच्या राजाला जीव वाचवणे कठीण गेले. व्हिडिओमध्ये सिंह म्हशीकडे जीवाची भीक मागताना दिसत आहे.

धावतो मोकळ्या मैदानात

सिंह आपला जीव वाचवण्यासाठी मोकळ्या मैदानात वेगाने धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी दोन शिंगे असलेली म्हैस जंगलाच्या राजाच्या मागे वेड्यासारखी पडली आहे. व्हिडिओमध्ये सिंह शिकारीपासून जीव वाचवून पळताना दिसत आहे. सिंह दोन शिंगे असलेल्या म्हशींना काही मिनिटांत अडवून ठेवतो, हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल, पण इथे चित्र उलटे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहू या…

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हिडिओमध्ये सिंह खूपच घाबरलेला दिसत आहे, तर विशाल म्हैस सिंहासमोर आपल्या टोकदार शिंगासह खूप शक्तिशाली दिसत आहे. म्हशीच्या मोठ्या आणि तीक्ष्ण शिंगांनी, सिंह घाबरून पळत सुटतो, जसे हरीण चित्त्यासमोर धावत असते. व्हिडिओमध्ये एक मोठे गवताचे मैदान दिसत आहे. ज्यामध्ये म्हैस सिंहावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. wild_animal_shorts_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Vultures : कोणत्यातरी गंभीर विषयावर बोलावण्यात आलीय तातडीची बैठक, पाहा गिधाडांचा Viral video

नोकरीतून निवृत्ती घेऊन शेतात पहिल्यांदाच गेल्यावर असं काहीतरी होणारच! पाहा अतरंगी Viral video

Video : ‘अशा’ नकला तर माणसंही करू शकणार नाहीत! पाहा, प्राण्यांचे मजेदार क्षण… एका क्लिकवर…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें