Leopard: शिकारीसाठी झाडावर चढलेल्या बिबट्याचा फांदीत अडकून मृत्यू, औरंगाबादच्या आमदाबाद शिवारातील घटना

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह फांदीवरून काढला. शिकारीच्या शोधात झाडावर चढला असताना त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

Leopard: शिकारीसाठी झाडावर चढलेल्या बिबट्याचा फांदीत अडकून मृत्यू, औरंगाबादच्या आमदाबाद शिवारातील घटना
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 6:49 PM
औरंगाबादः शिकारीसाठी झाडावर चढलेल्या बिबट्याचा (Leopard) फांदीत अडकून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड जवळच्या जंगलात घडली आहे. कन्नड तालुक्यातील आमदाबाद शिवारात ही घटना घडली असून झाडाला अडकलेल्या बिबट्याला पाहून गावकरी भयभीत होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

आमदाबाद शिवारात घटना

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध गौताला अभयारण्याजवळ आमदाबाद शिवार आहे. चार दिवसांपूर्वी याच परिसरात एका विहिरीत बिबट्या आढळला होता. गावकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला त्यासंदर्भात माहिती दिली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीदेखील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर काढून पिंजऱ्यात जेरबंद केले होते. त्यानंतर काहीच लगेच झाडावरील फांदीवर अशा रितीने बिबट्याचा मृतदेह आढळून आला.

झाडाला लटकलेल्याअवस्थेत मृतदेह

झाडाच्या फांदीला बिबट्याचा मृतदेह आढळल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली. अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी केली असता, प्रथम दर्शनी हा बिबट्या शिकार करण्यासाठी झाडावर चढला असावा आणि तेथेच फांदीत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
इतर बातम्या- 
Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.