Viral video : महिला घेत होती उंटासोबत सेल्फी, मग असं काही झालं की…, पाहा उंटाने नेमकं काय केलं?

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच उंटासोबत सेल्फी काढतानाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये महिला उंटासोबत सेल्फी घेत होती. पण, त्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं की त्या महिलेला हसूच अवरलं नाही. हा व्हिडीओ आणि त्यावरील प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल.

Viral video : महिला घेत होती उंटासोबत सेल्फी, मग असं काही झालं की..., पाहा उंटाने नेमकं काय केलं?
व्हायरल व्हिडीओImage Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 7:32 AM

मुंबई : कोणताही कार्यक्रम असो वा लग्न समारंभ सेल्फी (Camel) घेतला नाही की आजकालच्या पिढीला अपूरं अपूरं वाटू लागतं. सध्या लोकांमध्ये सेल्फीची चांगलीच क्रेझ आहे. लोकांना जिथे संधी मिळेल तिथे ते सेल्फी काढू लागतात. अनेकवेळा सेल्फी काढण्याच्या बाबतीतही दुर्घटना घडल्याच्या बातम्या आपण बातम्यांमधून वाचत असतो. इतकंच नाही तर अनेकदा लोकांसोबत असं काही घडलं की ज्याला पाहून आताही तुम्ही खळखळून हसाल. सेल्फी काढण्याच्या नादात अनेक तरुणांना आपला जीवही गमवावा लागलाय. अशा प्रकारे सर्व व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला (women) उंटासोबत सेल्फी घेत आहे. मात्र उंटाने महिलेसोबत असं काही कृत्य केलंय की कुणीही खळखळून हसेल.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

आता तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहिला. पण, त्यामध्ये नेमकं काय आहे ते समजून घेऊया, अनेकांना कुठेही गेलं की सेल्फी घेण्याची आवड असते. या व्हिडीओतील महिलेनं देखील तेच केलंय. व्हिडीओमध्ये एक महिला सेल्फी घेताना दिसत आहे. ही महिला पुराच्या जवळ उभी राहून सेल्फी घेत आहे. मग उंट तिच्याजवळ येतो आणि फोटो क्लिक करू लागतो. यादरम्यान, उंटाला अचानक काहीतरी होतं. पण उंटाला  अचानक काय होऊ लागतं ते कळत नाही. तो त्या महिलेचे केस त्याच्या तोंडातून पकडून तिला ओढतो. यादरम्यान महिला जोरजोरात ओरडू लागते. या व्हिडीमधील महिलेचा आक्रोश पाहून तुम्हाहा काहीतरी झाल्याचं लक्षात येईल. तुम्हीही विचार करू लागाल.

पाहा हा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओ कुणी ट्विट केला?

भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला ही बातमी देऊस्तर चार हजारांहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायेत.

नेटिझन्स काय म्हणतायेत?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही जण या महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर काहीजण या व्हिडीओला मजेदार म्हणत आहेत.

इतर बातम्या

नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा बार, आता डबल डेकर उड्डाणपूल होणार; 3 हजार कोटींचा खर्च येणार!

ऐन उन्हाळ्यात मालेगावमध्ये आज वीजपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागाला बसणार फटका?

आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.