VIDEO : डोसा जवळपास संपला अन् शेवटच्या घासात निघालं मेलेलं झुरळ; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील प्रकार उघडकीस

रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या एका फॅमिलीच्या जेवणात असं काही आढळलं आहे, की ज्यामुळे तुम्हाला किळस आल्याशिवाय राहणार नाही. त्याचा व्हिडिओ त्या फॅमिलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे . नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.

VIDEO :  डोसा जवळपास संपला अन् शेवटच्या घासात निघालं मेलेलं झुरळ; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील प्रकार उघडकीस
COCKROACH IN DOSA VIRAL VIDEO
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 11, 2026 | 11:12 AM

घरातल्या डोश्यापेक्षा बाहेरचा मसाला डोसा काही औरच लागतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून बटाटाच्या मसाल्याने भरलेला डोसा. समजा तुम्ही हा डोसा जवळपास संपवलात आणि शेवटच्या घासाला तुम्हाला त्या डोश्यात मेलेलं झुरळ दिसलं तर ? असाच एक धक्कादायक प्रकार एका रेस्टॉरंटमध्ये घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही घटना दिल्लीतील अशोक विहार परिसरातील सागर रत्ना या रेस्टॉरंटच्या आऊलेटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. रूशिल दत्ता नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओप्रमाणे त्यांनी डोसा जवळपास संपवलाच होता आणि शेवटच्या घासांमध्ये त्यांची नजर डोश्याच्या आत असलेल्या बटाटाच्या मसाल्यावर गेली. तिथे त्यांना मेलेलं झुरळ दिसली.

Loading...

हे दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का दिसला. त्यांनी लगेच या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. जवळपास संपूर्ण डोसा खाल्ल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने आपल्याला प्रचंड किळस आणि अस्वस्थता जाणवतं असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. व्हिडिओ शेअर केलेल्या माणसाने त्या पोस्टमध्ये यापूर्वीही असा प्रकार या हॉटेलमध्ये घडल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यांनुसार 30 ऑगस्ट रोजीदेखील याच ठिकाणी जेवण करणाऱ्या दुसऱ्या ग्राहकाला पदार्थात किडा आढळला होता. त्यामुळे कमेंट्मध्ये अनेकांनी अन्न सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. काहींनी अन्नपदार्थाच्या स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त करत भारतीय अन्न सुरक्षा आणि FSSAI ला टॅग केलं आहे. जेवणासाठी इतके पैसे देऊनही असं खायला मिळत असेल तर हे चुकीचे आहे. असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान या प्रकरणावर रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याची माहिती आहे. ही बातमी ग्राहकाने सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. त्यामुळे या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us