AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्यावर तरंगणारं असं एक गाव… पाण्यातच राहतात लोक; मग जिवंत कसे?

आज आपण जगातील अशा एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जे चक्क पाण्यावर तरंगतं. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मनात प्रश्न येईल की, शेवटी हे लोक पाण्याच्या मध्यभागी राहतात आणि जगतात कसे ? चला, जाणून घेऊया.

पाण्यावर तरंगणारं असं एक गाव... पाण्यातच राहतात लोक; मग जिवंत कसे?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 29, 2026 | 6:27 PM
Share

जगभरात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी, अशी काही ठिकाणं असतात, जी पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. कुठे वर्षभर बर्फाच्छादित वातावरण असते, तर कुठे लोक अक्षरशः ढगांच्या वर राहतात. पण आज आपण अशाच एका अनोख्या गावाची सफर करणार आहोत, जे जमिनीवर नाही, तर चक्क समुद्राच्या पाण्यावर वसलेले आहे. हे गाव आहे थायलंडमधील को पन्याई. फांग नगा उपसागराच्या शांत आणि निळ्याशार पाण्यात, उंचच उंच चुनखडीच्या खडकांच्या सान्निध्यात वसलेले हे गाव एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे भासते. दूरून पाहिल्यावर असं वाटतं की, संपूर्ण गाव पाण्यावर तरंगतं. मात्र हे केवळ सुंदर पर्यटनस्थळ नाही. या गावामागे शेकडो वर्षांचा संघर्ष, जिद्द आणि जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कहाणी दडलेली आहे.

पाण्यावर वसलेल्या या अनोख्या वस्तीत प्रामुख्याने मच्छीमार राहतात. मासेमारी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पाण्याच्या वर त्यांची घरे कशी बांधली असतील? तर दक्षिण थायलंडमधील फांग नगा उपसागरातील उथळ आणि शांत पाण्यामुळे मच्छीमारांनी मजबूत खांब उभारून त्यावर आपली घरे बांधली.

300 हून अधिक कुटुंबं

आज या तरंगत्या वस्तीत 300 हून अधिक कुटुंबं असून 1500 पेक्षा जास्त लोक कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. या सर्व लोकांची मुळे इंडोनेशियाशी जोडलेली आहेत. या गावाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी इंडोनेशियातून काही लोक समुद्रमार्गे या भागात येऊन स्थायिक झाले. त्या काळात थायलंडच्या कायद्यांनुसार परदेशी नागरिकांना जमीन खरेदी करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे जमिनीवर घर बांधण्याऐवजी त्यांनी समुद्रातच खांब उभारून आपले घरकुल तयार केलं.

जसजसा काळ पुढे सरकत गेल्या इथल्या पिढ्या बदलत गेल्या. आणि त्यायनंतर हा छोटासा निवासस्थानाचा भाग एका समृद्ध व स्वयंपूर्ण गावात रूपांतरित झाला. आज को पन्याईमध्ये शेकडो कुटुंबे राहतात. इथे फक्त घरंच नाहीत, तर मुलांसाठी शाळा, आरोग्य केंद्र, दुकाने, मशीद आणि पर्यटकांसाठी रेस्टॉरंट्ससुद्धा आहेत. म्हणजेच पाण्यावर उभारलेले हे गाव आज स्वतःच्या गरजा मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारे एक वेगळेच जग बनलं आहे.

फुटबॉल मैदानाने वेधलं लक्ष

पण या गावातील सर्वात लक्षवेधी गोष्टींपैकी एक म्हणजे येथील फुटबॉल मैदान. समुद्राच्या पाण्यावर उभारलेले हे मैदान पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. त्यामुळे को पन्याईला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे मैदान विशेष आकर्षण ठरतं.

मात्र, आजही या गावाचा कणा म्हणजे मासेमारीचा व्यवसायच आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटनामुळे स्थानिक लोकांच्या उपजीविकेला एक नवा आधार मिळालाय. आजच्या काळात येथील जवळपास निम्मी लोकसंख्या पर्यटनाशी संबंधित सेवांमध्ये व्यस्त असते. तर सुमारे 40 टक्के लोक आजही समुद्रात मासेमारी करून आपला चरितार्थ चालवतात.

आधुनिक जगाशी जोडले गेले असले तरी को पन्याईचे लोक काही आपल्या पारंपरिक संस्कृतीला आणि जीवनपद्धतीला विसरले नाहीत. त्यांच्या घरांची रचना, मासेमारीची परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामुदायिक जीवनशैली आजही या गावाची खास ओळख आहे. को पन्याईचे हे जादुई दृश्य आणि पाण्यावर वसलेली ही अनोखी संस्कृती म्हणजे केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर मानवी जिद्द, संघर्ष आणि जगण्याच्या इच्छेचे एक जिवंत उदाहरण आहे. इथे भेट देणं हा प्रत्येक पर्यटकाच्या आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय