हेल्मेट मॅन ऑफ इंडिया कोण आहे? काय करतो? व्हायरल व्हिडीओ

चालक, हेल्मेट किंवा सीट बेल्ट वापरण्यास टाळाटाळ करतात ही असतात. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने लोक अपघाताला बळी पडत आहेत.

हेल्मेट मॅन ऑफ इंडिया कोण आहे? काय करतो? व्हायरल व्हिडीओ
Helmet man of india
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 17, 2023 | 4:55 PM

महामार्गावरील अपघातांच्या बातम्या दररोज चर्चेत असतात आणि त्यातील बहुतेक कारण चालक, हेल्मेट किंवा सीट बेल्ट वापरण्यास टाळाटाळ करतात ही असतात. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने लोक अपघाताला बळी पडत आहेत. अशा निष्काळजी वाहनचालकांना धडा शिकवण्याची आणि दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी बिहारमधील एका व्यक्तीने घेतली आहे. राघवेंद्र सिंह यांना सोशल मीडियावर ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते.

विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला शिकवला धडा

राघवेंद्र सिंह अनेकदा वाहनचालकांना हेल्मेट आणि हेल्मेटशिवाय वाहन चालवण्याच्या धोक्यांविषयी इशारा देताना दिसतात. त्याने दुसऱ्या व्यक्तीला हेल्मेट दिल्याचा आणखी एक व्हिडिओ नुकताच ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या गाडीचा वेग 100 च्या वर नेत नाही पण लखनौ एक्सप्रेसवेवर जेव्हा एका व्यक्तीने मला ओव्हरटेक केले तेव्हा मी स्तब्ध झालो कारण हेल्मेट शिवाय त्याचा वेग आमच्यापेक्षा जास्त होता. त्याला प्रोटेक्टिव्ह हेल्मेट देण्यासाठी मला १०० च्या स्पीडपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवावी लागली आणि अखेर मी त्याला पकडले.”

आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवे वर शूट केलेला व्हिडीओ

राघवेंद्र यांनी आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर शूट केलेला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फुटेजमध्ये ते हेल्मेट घालून कार चालवताना दिसत आहे. ते विनाहेल्मेट असलेल्या त्या दुचाकीस्वाराला खिडकीतून नवीन हेल्मेट देतात आणि दुचाकी चालवताना हे हेल्मेट घाल असंही आवर्जून सांगतात. ही पोस्ट 11 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आणि त्याला अनेक प्रतिसाद मिळाले. मुंबई वाहतूक पोलिसांनीही या व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “याला मनापासून लोकांची काळजी घेणे म्हटले जाते.”