AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: मालकासोबत व्यायाम करणारा कुत्रा, नेटकरी म्हणाले, याहून हुशार कुत्रा पाहिला नाही!

एका कुत्र्याचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा आपल्या मालकाची नक्कल करताना दिसत आहे आणि कुत्राही त्यांच्यासोबत आपली तब्येत बनवण्यात मग्न आहे.

Video: मालकासोबत व्यायाम करणारा कुत्रा, नेटकरी म्हणाले, याहून हुशार कुत्रा पाहिला नाही!
मालकासोबस व्यायम करणारा कुत्रा
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 4:04 PM
Share

कोरोनानंतर आता लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता वाढली आहे. काहीजण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये जातात, तर काही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी घरीच व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. आता तर तो फीव्हर जनावरांवरही चढल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं एक कुत्रा त्याच्या मालकासोबत व्यायाम करताना दिसतो. (Dog Viral video who exercise with his owner people will loved this video)

एका कुत्र्याचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा आपल्या मालकाची नक्कल करताना दिसत आहे आणि कुत्राही त्यांच्यासोबत आपली तब्येत बनवण्यात मग्न आहे. कुत्र्याने केलेला हा व्यायाम लोकांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर यूजर्स या कुत्र्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

हा व्हिडिओ पाहा

भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती घराच्या छतावर व्यायाम करत आहे आणि त्याच्या मालकाला ते करताना पाहून कुत्राही त्यांची नक्कल करतो. या कुत्र्याने इंटरनेटवर सर्वांना आनंद दिला आहे आणि त्याचवेळी त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरणाही देत ​​आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लिहिपर्यंत 24 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 2000 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. लोक या मजेदार व्हिडिओवर सतत कमेंट करत आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूजरने सांगितले की, हे दृश्य खरोखरच मजेदार आहे की मी या कुत्र्याच्या प्रेमात पडलो. दुसरीकडे, दुसर्‍याने लिहिले की ‘जगातील सर्वात लायक कुत्रा’, आश्चर्यकारक! याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.

हेही पाहा:

Video: 1 मीटर लांब सापाला माशाने सहज गिळलं, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

Video: हातात बाटलीही पकडवेना, तरीही दारु पिण्याची हौस, तळीरामाचा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ व्हायरल!

 

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.