तुम्ही खाद्यपदार्थ वाया तर घालवत नाही ना? ‘हा’ Viral video पाहा, काय दिला संदेश?

Don't waste food message : खाद्यपदार्थांची नासाडी करू नका, असे मेसेज आपण नेहमी वाचत असतो. असाच एक व्हिडिओही (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. खाण्याचे पदार्थ वाया जाऊ देऊ नका, असा संदेश (Message) या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

तुम्ही खाद्यपदार्थ वाया तर घालवत नाही ना? हा Viral video पाहा, काय दिला संदेश?
खाद्यपदार्थ वाया घालवू नका, असा संदेश देणारा व्हिडिओ व्हायरल
Image Credit source: Youtube
| Updated on: Mar 31, 2022 | 7:30 AM

Don’t waste food message : खाद्यपदार्थांच्या नासाडीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो, वाचत असतो. सध्या लग्नसराई आहे. विविध लग्नसोहळ्यात प्रचंड खर्च केला जातो. यात खाद्यपदार्थांच्या डिशेसवरही मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. जेवढे मोठे लग्न तेवढा मोठेपणा मिरवण्याची अनेकांची हौस असते. तिथे पाहुण्यांच्या तुलनेत खाण्याचे पदार्थ जास्त केल्याने अनेकवेळा ते फेकून द्यावे लागते. हे तर झाले बाहेरचे. घरीही आपण बऱ्याचवेळा चांगले अन्नही फेकून देतो. त्यात एखाद्या गरिबाचे पोटही भरू शकते. मात्र हे आपल्या लक्षात येत नाही. खाद्यपदार्थांची नासाडी करू नका, असे मेसेज आपण नेहमी वाचत असतो. असाच एक व्हिडिओही (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. खाण्याचे पदार्थ वाया जाऊ देऊ नका, असा संदेश (Message) या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

मुलाचे नखरे

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला आणि तिचा मुलगा दिसत आहे. त्या आईने आपल्या मुलासाठी छोले बनवलेले असतात. त्या मुलाच्या आवडीचे असूनही तो ते खात नाही. मला नाही खायचे म्हणून खाण्याचे ताट पुढे सरकवतो. मला बर्गर खायचे आहे, असे म्हणतो. आईला वाईट वाटते. मग ती किचनमध्ये जाते. तिथे तिची कामवाली बाई असते. ती म्हणते मी घेऊन जाते. माझी मुले खातील हे.

यूट्यूबवर अपलोड

या व्हिडिओतून हाच संदेश देण्यात आला आहे, की तुमची चैन होते, मात्र त्यात एखाद्याचे पोट भरू शकते. यूट्यूबवर हा व्हिडिओ संज्योत नगी (sanjot nagi) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. 29 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला एका दिवसात 420k व्ह्यूज मिळाले आहेत. एक चांगला मेसेज दिला असल्याने यूझर्सना हा व्हिडिओ आवडला आहे. कॅप्शनमध्येच लिहिले आहे, की ‘Khane ki barbaadi na kare

आणखी वाचा :

जब डांस हो जाए आऊट ऑफ कंट्रोल..! ‘हा’ Video पाहून डोळ्यांतून पाणी येईल, पण हसून हसून…

11 मजले, स्विमिंग पूल आणि बरंच काही…; बिकारनेमधलं पक्ष्यांसाठीचं ‘हे’ अपार्टमेंट पाहिलं का?

Chimpanzee dance video : आता चिंपांझीलाही आवरला नाही मोह; ‘श्रीवल्ली’वर असा काही डान्स केली, की यूझर्स खूश!