AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 मजले, स्विमिंग पूल आणि बरंच काही…; बिकारनेमधलं पक्ष्यांसाठीचं ‘हे’ अपार्टमेंट पाहिलं का?

Amazing apartment for birds : आता पक्ष्यांसाठीही इमारती बांधल्या जात आहेत. राजस्थानच्या (Rajasthan) बिकानेर (Bikaner) जिल्ह्यात हे पाहायला मिळाले आहे. पक्ष्यांसाठी (Birds) असे अपार्टमेंट बनवण्यात आले आहे. पक्ष्यांचा किलबिलाट इथे पाहायला मिळत आहे.

11 मजले, स्विमिंग पूल आणि बरंच काही...; बिकारनेमधलं पक्ष्यांसाठीचं 'हे' अपार्टमेंट पाहिलं का?
बिकानेर जिल्ह्यातलं पक्ष्यांसाठीचं अपार्टमेंटImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 30, 2022 | 12:46 PM
Share

Amazing apartment for birds : वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या शहरांमध्ये अपार्टमेंट आणि उंच इमारतींचा जणू पूरच आला आहे. लाखो लोक अपार्टमेंटमध्ये स्थायिक होऊ लागले आहेत आणि दोन किंवा तीन बीएचके फ्लॅटमध्ये राहत आहेत. पण कधी पक्ष्यांचा विचार तुम्ही केला आहे का? आपण आपल्या आजूबाजूला इमारतींच्या वर कुठेतरी किंवा झाडांवर ते आपले घरटे बांधतात. पण आता पक्ष्यांसाठीही इमारती बांधल्या जात आहेत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. होय, असेच काहीसे राजस्थानच्या (Rajasthan) बिकानेर (Bikaner) जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. पक्ष्यांसाठी (Birds) असे अपार्टमेंट बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये ते फक्त येऊन राहू शकत नाहीत, तर आतल्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळही करू शकतात. पक्ष्यांचा किलबिलाट आता इथे पाहायला मिळत आहे.

11 मजल्यांचे अपार्टमेंट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात असा अनोखा अपार्टमेंट बनवण्यात आले आहे. हे पक्ष्यांचे अपार्टमेंट 11 मजल्यांचे आहे. त्यात प्रत्येक सुखसोयींची काळजी घेण्यात आली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्यात पक्ष्यांना आंघोळ करण्यासाठी स्विमिंग पूलही तयार करण्यात आला आहे. या अपार्टमेंटमध्ये सुमारे 1100 पक्षी राहू शकतात. राजस्थानमधील बिकानेरमधील श्रीडुंगरगडच्या टोलियासर गावात हे विशेष अपार्टमेंट तयार करण्यात आले आहे.

ट्विटरवर शेअर

आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला 18 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हे अपार्टमेंट आहेच असे. या अपार्टमेंटमध्ये पक्षी येऊन त्यांची घरटी तयार करू शकतात. यासोबतच त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च आला. हे अपार्टमेंट घुमटाच्या आकारात बनवण्यात आले आहे, जेणेकरून पक्षी कोणत्याही बाजूने येऊन त्यामध्ये वस्ती करू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक पक्षी आतापासूनच येऊन राहू लागले आहेत. त्यांना राहण्यासाठी मातीची घरेही बांधण्यात आली आहेत.

आणखी वाचा :

Shocking video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 3 सेकंदांत कोसळली 5 मजली इमारत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Chimpanzee dance video : आता चिंपांझीलाही आवरला नाही मोह; ‘श्रीवल्ली’वर असा काही डान्स केली, की यूझर्स खूश!

Inspirational : संकटकाळात मार्ग सापडत नाही? ‘हा’ Video पाहा, आयुष्याच्या वाटेवर नक्कीच ठरेल उपयोगी

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.