Viral Video : पक्ष्याने बांधलं एका पानावर घरटं, व्हिडीओ एकदा पाहाच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 05, 2021 | 4:45 PM

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पक्ष्याने बांधलेले घरटे दाखवण्यात आले आहे. (bird beautiful nest video)

Viral Video : पक्ष्याने बांधलं एका पानावर घरटं, व्हिडीओ एकदा पाहाच
bird nest

Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओंमध्ये काही पक्ष्यांचेसुद्धा व्हिडीओ असतात. पक्ष्यांचे आकर्षक रुप, त्यांचा चिवचावाट अनेकांना चांगलाच आवडतो. याच कारणामुळे पक्ष्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून पसंद केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पक्ष्याने बांधलेले घरटे दाखवण्यात आले आहे. (beautiful nest prepared by Bird video goes viral on social media)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय आहे ?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूपच आनंदीत झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक अतिशय सुंदर असं घरटं दाखवण्यात आलंय. बरं हे घऱटं काही एका झाडावर किंवा ईमारतीवर नाहीये. तर एका पक्ष्याने आपल्या पिलांसाठी चक्क एका पानावर घरटं बांधलं आहे. हे घरटं कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं असून त्याचाच हा व्हिडओ आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडतो आहे.

पक्ष्याने घरटं कसं बांधल ?

या व्हिडीओमध्ये एक घरटं दिसत आहे. हे खरटं काही साधं नाहीये. तर त्याला फक्त एका पानावर बांधण्यात आलं आहे. एका पानावर घरटं बांधण्यासाठी पक्ष्याने त्या पानाला खालून दोन्ही बाजूंनी चिकटवले आहे. त्यानंतर पानामध्ये तयार झालेल्या पोकळ जागेत पक्ष्याने एक छानसं घरटं बांधलं आहे. पक्ष्याची ही कमाल पाहून तुम्हीसुद्धा या घरट्याच्या प्रेमात पडाल.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान, व्हिडीओतील घरटं कोणत्या पक्ष्याने बांधलं आहे, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या घऱट्यामध्ये एकूण तीन अंडी दिसत आहेत. जन्म घेणारी पिलं ही सुरक्षित राहावित म्हणून पक्ष्याने अशा ठिकाणी घरटे बांधले असावे. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंद व्यक्त करत असून व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच अनेकजण लाईक आणि कमेंट्ससुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | जंगल सफारीमध्ये पर्यटक गुंग, अचानक सिंहाने केला हल्ला, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

VIDEO : हळद, वरात ते मिरवणुका, या तरुणाच्या डान्सला तोड नाही

Viral Video : दारुड्या नवरदेवाची करामत, नवरी समोर असताना केलं भलतंच काम, सोशल मीडियावर धुमाकूळ

(beautiful nest prepared by Bird video goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI