Video | हवेच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर थरारक स्टंट, माणसाचं धाडस एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये एक माणूस घोड्यावर बसून धक्क करणारे स्टंट करतो आहे. (man stunt on horse)

Video | हवेच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर थरारक स्टंट, माणसाचं धाडस एकदा पाहाच
horse and man viral video

मुंबई : चर्चेत राहण्यासाठी कधी कोण काय करेल याचा नेम नाही. सोशल मीडियावर चर्चा व्हावी म्हणून अनेक लोक भन्नाट डोकं लावतात. सध्या अशाच एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा माणूस घोड्यावर बसून धक्क करणारे स्टंट करतो आहे. तो करत असलेला स्टंट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. (Man shows surprising stunt on Horse video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक माणूस धावत्या घोड्यावर स्टंट करताना दिसतोय. व्हिडीओला बारकाईने पाहिलं तर अनेक गोष्टी आपल्याला समजू शकतात. सर्वात प्रथम पाहायचं झालं तर व्हिडीओतील घोडा हा प्रचंड वेगात धावत असल्याचं दिसतंय. हवेच्या वेगाने धावणाऱ्या या घोड्यावर व्हिडीओतील माणूस बिनधास्तपणे मुशाफीरी करतोय.

पठ्ठ्याकडून थक्क करुन सोडणारे स्टंट

व्हिडीओमध्ये माणूस वेगात धावणाऱ्या घोड्यावर बिनधास्तपणे बसल्याचं दिसतंय. व्हिडीओतील घोडा हिरवळीमध्ये धावतोय. यावेळी घोड्यावर बसलेला माणूस  कधीकधी पूर्णपणे एका बाजूला होऊन कोलांटऊड्या खात असल्याचे दिसतेय. पुढच्याच वेळेला तो चालत्या घोड्यावर उभा रहतोय. पुन्हा घोड्याबर बसून तो गोल-गोल फिरतोय. या माणसाचे असे स्टंट पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे निश्चित समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडीओला ‘Hold My Beer’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेले आहे. हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांकडू भन्नाट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच अनेकजण या व्हिडीओला आपल्या अकाऊंटवर शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | प्रेयसीला पाहण्यासाठी जीवाची घालमेल, पठ्ठ्याने थेट नवरीचा साज चढवला, व्हिडीओ व्हायरल

Video | आकर्षक साज, हातात फुलं, गोड नवरी नवरदेवाकडे आली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

Video : आधी स्वत:च्या लग्नात झिंगाट डान्स, आता ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’वर बहारदार नृत्य, श्वेता शिंदेचा व्हिडीओ व्हायरल

(Man shows surprising stunt on Horse video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI