Video | प्रेयसीला पाहण्यासाठी जीवाची घालमेल, पठ्ठ्याने थेट नवरीचा साज चढवला, व्हिडीओ व्हायरल

आपल्या प्रेयसीला एकदा पाहता यावे म्हणून या पठ्ठ्याने चक्क नवरीचा साज आपल्या अंगावर चढवला आहे. (boyfriend meet girlfriend bridal costume)

Video | प्रेयसीला पाहण्यासाठी जीवाची घालमेल, पठ्ठ्याने थेट नवरीचा साज चढवला, व्हिडीओ व्हायरल
boyfriend bridal attire
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 5:00 PM

भदोही : असं म्हणतात की प्रेमाला सीमा नसते. एकदा का मनं जुळली की एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. मग त्यासाठी जे शक्य असेल ते जुगाड प्रेमी युगुल करण्यास तयार असतात. सध्या अशाच एका प्रियकराच्या धमाकेदार जुगाडाची सगळीकडे चर्चा होत आहे. आपल्या प्रेयसीला एकदा पाहता यावे म्हणून या पठ्ठ्याने चक्क नवरीचा साज आपल्या अंगावर चढवला आहे. नवी नवरी होऊन हा प्रियकर आपल्या प्रेयसीच्या घरात शिरलाय. मात्र, नंतर अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यामुळे या प्रियकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Boyfriend reach in Bridal costume to meet his Girlfriend video goes viral on social media)

प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क नवरी झाला

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील भदोही जिल्ह्यातील आहे. येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी नवरीचा साज अंगावर चढवला आहे. खूप दिवसांपासून प्रेयसीला न भेटल्यामुळे या प्रियकराच्या मनाची घालमेल होत असावी. याच कारणामुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला असावा.

नवरी होऊ थेट प्रेयसीच्या घरात शिरला

यावेळी त्याने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी नव्या नवरीचा साज चढवून जाण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे तो आपल्या प्रेयसीच्या घरामध्ये शिरलासुद्धा. आपल्या मुलीला नव्याने लग्न झालेली तिची एखादी मैत्रिण भेटायला आली असावी, असे मुलीच्या घरच्यांना वाटले. याच कारणामुळे त्या मुलीच्या घरच्यांनी कसलीही चौकशी केली नाही.

ऐनवेळी बिंग फुटलं, कुटुंबीयांना राग अनावर

मात्र, ऐनवेळी या प्रेमी युगुलाचं बिंग फुटलं. नव्या नवरीसारखी वेशभूषा करून आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराची पोल खुलली. मुलीच्या घरच्यांना संशय आल्यामुळे त्यांनी चौकशी केली. घरात घुसलेली नवी नवरी नसून आपल्या मुलीचा प्रियकर आहे, हे समजल्यावर त्यांना राग अनावर झाला.

प्रियकराने घरातून पळ काढला

त्यानंतर घरात घुसलेल्या आपल्या मुलीच्या प्रियकराला तिच्या कुटुंबीयांनी मारणे सुरु केले. मात्र, आपल्या प्रेयसीच्या घरच्यांनी पकडल्यामुळे तसेच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच प्रियकराने तिच्या घरातून पळ काढला. यावेळी काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शुट करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिलेली नाही. मात्र, या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | आकर्षक साज, हातात फुलं, गोड नवरी नवरदेवाकडे आली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

Video : आधी स्वत:च्या लग्नात झिंगाट डान्स, आता ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’वर बहारदार नृत्य, श्वेता शिंदेचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO : दारुच्या नशेत नवरदेव लग्नात पोहचला, नंतर जे झालं ते पाहून कुणालाही हसू आवरणार नाही

(Boyfriend reach in Bridal costume to meet his Girlfriend video goes viral on social media)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.