VIDEO : दारुच्या नशेत नवरदेव लग्नात पोहचला, नंतर जे झालं ते पाहून कुणालाही हसू आवरणार नाही

एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर होतोय. तो पाहणाऱ्या प्रत्येकाला जोरदार हसू फुटतंय.

VIDEO : दारुच्या नशेत नवरदेव लग्नात पोहचला, नंतर जे झालं ते पाहून कुणालाही हसू आवरणार नाही


नवी दिल्ली : दारु हे व्यसन असं आहे की ज्याला लागतं तो पुन्हा त्यापासून दूर होणं महाकठीण काम. दारुचं व्यसन सुरुवातीला नियंत्रित वाटतं, मात्र नंतर त्याचं प्रमाण इतकं वाढतं की त्याचं प्रमाण नियंत्रणाबाहेर कधी जातं हे चांगल्या चांगल्यांनाही कळत नाही. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर होतोय. तो पाहणाऱ्या प्रत्येकाला जोरदार हसू फुटतंय. व्हिडीओतील हा व्यक्ती स्वतःच्या लग्नातही स्वतःला दारुपासून दूर ठेऊ शकला नाही आणि लग्नाच्या दिवशी मंडपात दारु पिऊन आला. त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा (Video of Marriage where groom drink alcohol liquor and make chaos).

दारुचं व्यसन लागणारा एक व्यसनी तरुण लग्नमंडपात पिऊन येतो. त्यानंतर नातेवाईक त्याला त्या स्थितीतही कसंबसं उभं करुन नवरीला वरमाला (हार) घालण्यास सांगतात. मात्र, त्याचं दारुमध्ये इतकं भान हरपलेलं असतं की तो नवरी ऐवजी तिच्यासोबत असलेल्या कलवरीलाच हार घालण्याचा प्रयत्न करतो. ते लक्षात येताच उपस्थित त्याला नवरीच्या गळ्यात हार टाकायला लावतात. त्यावेळी तो कसा बसा पुन्हा हार घालायला हात पुढे करतो मात्र नशेमुळे तो हार घालण्याआधीच खाली खुर्चीवर पडतो.

हा व्हिडीओ कुणाचा आहे आणि नेमका कुठला आहे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, इंस्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटर अशा सर्व लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. लोक हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट करत आहेत. तसेच दारुचं व्यसन असणाऱ्यांची खेचत आहेत. दारुचं समर्थन करणाऱ्यांनाही या व्हिडीओवरुन चिमटे काढले जात आहेत.

हेही वाचा :

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट : सुधीर मुनगंटीवार

‘चंद्रपूरसाठी काळा दिवस, दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अपयशी?’ पद्मश्री बंग दाम्पत्याचा ठाकरे सरकारला सवाल

व्हिडीओ पाहा :

Video of Marriage where groom drink alcohol liquor and make chaos

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI