5

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठवण्याच्या निर्णयावर सटकून टीका केलीय.

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 2:20 AM

चंद्रपूर : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठवण्याच्या निर्णयावर सटकून टीका केलीय. “ठाकरे सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय. आरक्षणाचा विषय सोडून देऊन दारुबंदी हटवल्यानं आनंदी व्हा असं काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगितलंय,” असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. सरकारचा तर्क अजब असल्याची म्हणत अवैध विक्री होते म्हणून गांजा, ड्रग्ज, गुटखा, प्लास्टिकवरील बंदीही उठवणार का? असाही संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी केलाय (BJP leader Sudhir Mungantiwar and Devendra Fadnavis criticize Thackeray government over removal of alcohol ban in Chandrapur).

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. सरकारने हा निर्णय घेताना काय तर्क लावलाय माहिती नाही. जर अवैध दारु विकली जाते म्हणून दारुबंदी हटवली असेल तर तो प्रकार वर्धामध्येही होतो. तेथे महात्मा गांधींचा आश्रम आहे ती त्यांची कर्मभूमी आहे म्हणून तिथे तसा निर्णय नाही का? सरकारचा तर्क पटत नाही.”

“गांजा, ड्रग्ज, गुटखा, प्लास्टिकची अवैध विक्री होते, बंदी उठवणार का?”

“अवैध विक्री होते म्हणून बंदी हटवायची असेल तर मग गुटखा, पानपराग, जाफरानीवर बंदी का आहे? कोणत्याही पानपट्टीवर गेलात तर मिळतं. यातून राज्याचं सरासरी 1000 कोटी रुपयांचं महसूल बुडतं. मग पानपट्टीवाल्यांना अटक का करतो? प्लास्टिक बंदीने 750 कोटी रुपयांचं नुकसान होतं. तसेच हजारो लोक बेरोजगार झाले. पण पर्यावरणासाठी आपण प्लास्टिक बंदी केली. असं असलं तरी अवैधपणे प्लास्टिक विकलं जातं. मग प्लास्टिकवरील बंदी हटवणार आहेत का?” असा प्रश्न मुनगंटीवार यांनी केला.

“दारुमुळे लहान मुलांन्या खाऊचे पैसे कुटुंब उद्ध्वस्त करुन काही लोकांच्या पोटात”

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खरंतर काँग्रेसचं सरकार असताना एक समिती तयार करण्यात आली. या समितीला 588 ग्रामपंचायतींनी दारुबंदीचे ठराव दिले. 5000 पेक्षा जास्त महिला पायी क्रांतीभूमी चिमुरहून नागपूरला गेल्या. आर. आर. पाटलांनी त्या महिलांना आश्वासन दिलं. त्यानंतर ही समिती तयार करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे, डॉ. अभय बंग हे त्या समितीचे सदस्य होते. त्या समितीने आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात घेऊन दारुबंदी केली. या जिल्ह्यात लोकांचे दारुमध्ये हजारो कोटी रुपये खर्च व्हायचे. ज्या पैशांचा लहान मुलांना खाऊ मिळावा ते पैसे कुटुंब उद्ध्वस्त करुन काही लोकांच्या पोटात जात होता.”

“गांजा, ड्रग्ज, गुटखा, प्लास्टिकची अवैध विक्री होते, बंदी उठवणार का?”

“अवैधपणे विक्री होते म्हणून बंदी हटवणार असाल तर गांजावरील बंदी हटवणार आहेत का? ड्रग्ज पार्टी अवैधपणे होतात, रेव्ह पार्टी होतात हे सुरु करणार का? या सरकारचं दारुवर खूप प्रेम आहे. कोरोनाच्या काळात सरकारने इतर निर्णय घेतलेले नाहीत, पण दारुवर यांनी घाईघाईने निर्णय घेतला,” असंही मुनगंटीवार म्हणाले.

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “एकीकडे काँग्रेसचे काही नेते पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सरकारचा पाठिंबाही काढू शकतो अशी भीती दाखवत होते. अशावेळी काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट देण्यात आलंय. पदोन्नतीत आरक्षण देत नाही, पण तुमच्या मागणीनुसार दारुबंदी हटवतो. आता तुम्ही आनंदी राहा असं सांगण्याचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे.”

“आता पुढची भूमिका जनतेची असणार आहे. आधी देखील दारुबंदी जनतेच्या भूमिकेतून झाली. 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले होते. महिलांचे मोर्चे निघाले. भविष्यात लोक जसे पुढे येतील आणि दारुबंदीची मागणी करतील तेव्हा आम्ही लोकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू,” असं मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

“चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते म्हणाले, “राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.”

हेही वाचा :

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय

चंद्रपुरात दारूबंदी उठवण्याच्या हालचाली, डॉ. अभय बंग यांचे मंत्रिमंडळाला 14 मुद्द्यांचे खरमरीत पत्र, वाचा…

दारुबंदी समीक्षा समिती’ बनवण्याचा लोकहित विरोधी निर्णय रद्द करा, वनराई संस्थेचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांची मागणी

व्हिडीओ पाहा :

Sudhir Mungantiwar criticize Thackeray government over removal of alcohol ban in Chandrapur

Non Stop LIVE Update
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?