Video | आकर्षक साज, हातात फुलं, गोड नवरी नवरदेवाकडे आली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

एका लग्न समारंभातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपला होणारा नवरा समोर- पाहून नवरीचे बदललेले हावभाव पाहण्यासारखे आहेत. (bride gets angry on groom video)

Video | आकर्षक साज, हातात फुलं, गोड नवरी नवरदेवाकडे आली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच
bride groom viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड आणि शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असल्यामुळे ते व्हायरलसुद्धा होतात. सध्या असाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपला होणारा नवरा समोर पाहून नवरीचे बदललेले हावभाव पाहण्यासारखे आहेत. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Bride gets angry throws flower on face of Groom video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

स्वत:च्या लग्नाचा क्षण हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असतो. हा क्षण आनंददायी आणि आठवणीत राहावा म्हणून अनेकजण वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र, अनेकवेळा असे काही प्रसंग समोर येतात, ज्यामुळे नवरी किंवा नवऱ्या मुलाची चांगलीच भंबेरी उडते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवऱ्या मुलाला अतिशय वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

नवऱ्या मुलाची चांगलीच फजिती

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक नवरी आकर्षक साज चढवून लग्न मंडपात येताना दिसतेय. मंडपात येत असताना तिच्या एका हातामध्ये फुलांच्या पाकळ्या आहेत. या नवरीने अंगावर साज चढवल्याचे दिसत असले तरी मनातून ती खुश नसल्याचे तिच्याकडे पाहून वाटतेय.

फुलं थेट नवऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर भिरकावले

लग्नविधी पार पाडण्यासाठी ती समोर उभ्या असलेल्या नवऱ्या मुलाकडे येताना दिसतेय. थोड्या वेळाने ही नवरी नवऱ्या मुलाजवळ येऊन उभीसुद्धा राहिली आहे. मात्र, याच वेळी नवऱ्या मुलाजवळ आल्यानंतर ती चांगलीच खवळली आहे. आपल्या हातात असलेली फुले तिने थेट नवऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर भिरकावले आहेत. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, नवरीच्या हातामध्ये फुल पाहून नवऱ्या मुलाला सुरुवातीला आनंद झाला असावा. होणारी बायको आपल्याला प्रेमाणे फुल देईल असे नवरदेवाला वाटले असावे. मात्र, याच वेळी नवरीने त्याच्यासोबत केलेल्या वरील प्रकारामुळे त्याची चांगलीच धांदल उडाली. हा प्रकार समोर आल्यानंतर तो ‘official_niranjanm87’ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पाहून अनेकजण मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

पोपटाने गिटारच्या धूनवर गायलं भन्नाट गाणं, नेटकरी हैराण, लाखों युजर्सनी पाहिला Video

VIDEO : दारुच्या नशेत नवरदेव लग्नात पोहचला, नंतर जे झालं ते पाहून कुणालाही हसू आवरणार नाही

Viral Video : दारूसाठी जीवाचा आटापिटा, माणसाचे देशी जुगाड एकदा पाहाच

(Bride gets angry throws flower on face of Groom video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI