Video | जंगल सफारीमध्ये पर्यटक गुंग, अचानक सिंहाने केला हल्ला, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 05, 2021 | 3:54 PM

सध्या अशीच एक मजेदार जंगलसफारी चर्चेचा विषय ठरली आहे. या जंगलसफारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (lion tourist attack video)

Video | जंगल सफारीमध्ये पर्यटक गुंग, अचानक सिंहाने केला हल्ला, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !
lion viral video

मुंबई : पर्यटनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्माल करायला सगळ्यांनाच आवडते. यामध्ये काही लोक हे जंगल सफारी करण्यास जास्त प्राधान्य देतात. जंगलामध्ये फिरून वेगवेगळ्या प्राण्यांना पाहण्याची हौस अनेकांना असते. मात्र, कधीकधी अशा काही घटना घडतात, ज्यामुळे ही हौस चांगलीच अंगलट येते. जंगलात फिरायला गेल्यानंतर उडालेला गोंधळ हा अनेकवेळा चर्चेचा विषय ठरतो. सध्या अशीच एक मजेदार जंगल सफारी चर्चेचा विषय ठरली आहे. या जंगल सफारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Lion attack on tourist video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

जंगलात फिरायला गेल्यानंतर काळजी घेणे गरजेचे असते. कधी एखादा हिंस्र प्राणी समोर येईल आणि आपल्यावर हल्ला करेल हे सांगता येत नाही. त्याची प्रचिती व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आली आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक एका खुल्या जीपमधून प्रवास करताना दिसत आहेत. या जीपमध्ये अनेक प्रवासी आहेत. जंगलात फिरताना हे प्रवासी आजूबाजूचा परिसर पाहून मोहरुन गेले आहेत. मात्र, याच वेळी त्यांच्या खुल्या जीपमध्ये एक सिंह शिरला आहे. या सिंहाने थेट जीपमध्ये उडी मारली. जीपमध्ये उडी घेतल्यानंतर हा सिंह मात्र कोणावरही हल्ला करत नाहीये. उलट तो पर्यटकांमध्ये जाऊन त्यांच्याशी लडीवाळपणे खेळतो आहे.

सुरुवातीला पर्यटक घाबरले

खुल्या जीपमध्ये बसलेल्या पर्यटकांकडे हा सिंह येत असेल तेव्हा ते चांगले घाबरले असतील. मात्र, सिंह जवळ आल्यानंतर त्याने घातलेले लाड या पर्यटकांना चांगलेच भावल्याचे दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ The Unexplained या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून लोक या व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 17 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. अजूनही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इतर बातम्या :

VIDEO : हळद, वरात ते मिरवणुका, या तरुणाच्या डान्सला तोड नाही

दोन चिमुकल्यांची थेट पंतप्रधानांना साद; शाळा बंद राहिल्यामुळे मुलांनी बनवला धम्माल व्हिडिओ

Viral Video : दारुड्या नवरदेवाची करामत, नवरी समोर असताना केलं भलतंच काम, सोशल मीडियावर धुमाकूळ

(Lion attack on tourist video goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI