Building collapsed : संध्याकाळी काम करून कंटाळून माणूस घरी पोहोचतो. कोणत्याही व्यक्तीचे सर्वात प्रिय ठिकाण म्हणजे त्याचे घर. कल्पना करा, जर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरी पोहोचलात आणि तो तिथे तुमचे घर नसेल, ते जमिनीवर कोसळले असेल तर? आपल्याकडे काहीच उरले नाही, असे तुम्हाला वाटेल. आपण सर्वस्व गमावल्याची भावना होईल. सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हादराच (Shock) बसेल. एक इमारत कोसळली आहे तीही 3 सेकंदांत. हा व्हिडिओ 5 मजली इमारतीशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये 5 मजली इमारत अवघ्या 3 सेकंदात कोसळल्याचे दिसून येते. या इमारतीत राहणाऱ्या लोकांचे काय झाले असेल याचा विचार करा. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्तच झाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही दु:ख होईल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की 5 मजली इमारत प्रथम एका बाजूला कलंडते आणि पाहताच ती कोसळते. या 5 मजली उंच इमारतीच्या कचाट्यात एक छोटेसे घरही येते आणि तेही गाडले गेल्याने उद्ध्वस्त झालेले दिसते. त्याचवेळी इमारत पूर्णपणे कोसळते. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असून तो हिमाचल प्रदेशचा आहे. अहवालानुसार, मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे हे घर एका झटक्यात कोसळले. आता हा व्हिडिओ पाहू या…
View this post on Instagram
पावसाळ्याच्या दिवसात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अशी दृश्ये पाहायला मिळतात. कधी दरड कोसळून घरांचे नुकसान होते, तर कधी रस्ते तुटतात. हा व्हिडिओ theournaturee नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 35 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.