गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली, मलब्याखाली काहीजण अडकल्याची भीती

गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली, मलब्याखाली काहीजण अडकल्याची भीती
गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली, मलब्याखाली काहीजण अडकल्याची भीती

चंदिगड (हरियाणा) : मुंबईच्या चेंबूर येथील घरांवर संरक्षण भिंत कोसळल्याची दुर्देवी घटना ताजी असतानाच आता नवी दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राममधून अशीच एक घटना समोर आली आहे. गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित दुर्घटना ही संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली, अशी माहिती समोर येत आहे. ही घटना गुरुग्रामच्या फरुखनगर येथील खावसपूर भागात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु आहे. मलब्याखाली सध्या 12 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

पावसामुळे बचावकार्याला अडचणी

“आम्हाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. सध्या बचाव कार्य जारी आहे”, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी दाखल झालेले DCP राजीव देसवाल यांनी दिली. बचावकार्याचं काम सुरु असलं तरी त्या कामात पावसाचं व्यत्यय येत आहे. पण भर पावसातही बचाव कार्य जारी आहे.

मुंबईत चेंबूर दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळ चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे  एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.  यात 18 जणांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या : 

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI