AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर

मुंबई मनपा क्षेत्रात शनिवारच्या (18 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता.

मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर
Mumbai Rains
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 4:11 PM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवारच्या (18 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. त्याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा, 24 विभाग कार्यालये, मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि 25 सहाय्यकारी नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल आदी सर्व यंत्रणा रात्रभर अव्याहतपणे कार्यरत होती. त्याचबरोबर महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालय आणि उपनगरीय रुग्णालये यांना देखील खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध 60 ठिकाणी असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर या पावसाची नियमित नोंद घेतली जात होती. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे उपलब्ध होत असलेल्या पावसाच्या या आकडेवारीचे सातत्यपूर्ण विश्लेषण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये करण्यात येत होते व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील महापालिकेच्या विभाग कार्यालयांना रात्रभर नियमितपणे देण्यात येत होत्या. (Mumbai Records Over 200 MM Rain In last 24 Hours)

रात्री 11 वाजेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर पहाटे 4 वाजेनंतर कमी झाला. रात्री 11 ते पहाटे 4 या साधारणपणे 5 तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे 226.82 मिलिमीटर इतका पाऊस हा ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे.

दहिसर खालोखाल चेंबूर परिसरात 218.45 मिलिमीटर, विक्रोळी पश्चिम परिसरात 211.08 मिलिमीटर, कांदिवली परिसरात 206.49 मिलिमीटर, मरोळ परिसरात 205.99 मिलिमीटर, बोरिवली परिसरात 202.69 मिलिमीटर, किल्ला (फोर्ट) परिसरातील महापालिका मुख्यालय येथे 201.93 मिलिमीटर आणि ‘जी दक्षिण’ विभाग परिसरात (वरळी) 200.4 मिलिमीटर इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे

उर्वरित स्वयंचलित हवामान केंद्रांवर देखील सदर 5 तासांच्या कालावधीदरम्यान 125.73 ते 199.86 मिलिमीटर इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मुंबईत 22,483 कुटुंबीय जगताहेत जीवमुठीत घेऊन, 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही; धक्कादायक माहिती उघड

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बरसला, 2 तासाच्या पावसाने वसई-विरार-नालासोपाऱ्यात हाहा:कार उडवला!

(Mumbai Records Over 200 MM Rain In last 24 Hours)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.