Mumbai Water Logging : मुंबईत पावसाची दाणादाण, अनेक भागात पाणी साचलं तर रस्त्यांना नद्यांचं स्वरुप

मध्यरात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे रस्त्यांना नदीचं रुप आलं होतं. (Mumbai Water Logging)

1/9
मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. जवळपास पाच-सहा तास तुफान पाऊस बरसला. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

2/9
रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं.

3/9
सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं.

4/9
मुंबईतील काही परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अनेकांना तशाच अवस्थेत रात्र काढावी लागली.

5/9
मध्यरात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे रस्त्यांना नदीचं रुप आलं होतं. हिंदमाता परिसरात पाणीच पाणी साचलं आहे. पाणी तुंबल्यामुळे परिसरातील गाड्या पाण्यात गेल्या. स्टेशन परिसरातही पाणी साचलेलं पाहायला मिळालं.

6/9
हिंदमाता परिसरात रात्री गाड्यांना मार्ग दाखवण्याचं काम सुरू होतं. काही जवानांकडून हे प्रयत्न सुरू होते.

7/9
दादर आणि परेल परिसरात रात्रीपासूनच प्रचंड पाणी साचलेलं होतं. या पाण्यातून गाड्यांनी मार्ग काढला.

8/9
रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे सकाळी नागरिकांना कामावर जाण्यात अनेक अडचणी आल्या. पाण्यातून या नागरिकांनी पायवाट काढली.

9/9
रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI