AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बरसला, 2 तासाच्या पावसाने वसई-विरार-नालासोपाऱ्यात हाहा:कार उडवला!

 दोन तासाच्या पावसाने वसई विरार नालासोपाऱ्यात संपूर्ण हाहाकार माजवला होता. मध्यरात्री 2 ते 4 अशा 2 तासात 181 मिलिमीटर पाऊस पडला आहे. (Vasai Virar heavy Rain Update only 2 hour 181 mm Rain)

आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बरसला, 2 तासाच्या पावसाने वसई-विरार-नालासोपाऱ्यात हाहा:कार उडवला!
Vasai Virar Rain
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 2:06 PM
Share

वसई विरार : दोन तासाच्या पावसाने वसई विरार नालासोपाऱ्यात संपूर्ण हाहाकार माजवला होता. मध्यरात्री आभाळ फुटल्याप्रमाणे अचानक मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूर्ण परिसर जलमय झाला होता. मध्यरात्री 2 ते 4 अशा 2 तासात 181 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वजण झोपेत असताना सलग मुसळधार पावसाने वसई विरार नालासोपाऱ्याला पावसाने धुवून काढले. रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरुप आलं होतं. शहरातील सकल भागातील रस्ते, मुख्य रस्ते, सोसायटी, उधोगिक वसाहतीत गुडगाभार, मांडी ते छातीइतकं पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पहाटे पाऊस थांबला, सकाळी ऊन पडले पण दुपारपर्यंत साचलेले पाणी ओसारलेच नसल्याने नागरिक, मुके प्राणी सर्वांचे हाल झाले.

कोण-कोणता परिसर जलमय?

नालासोपारा पूर्व पश्चिम स्टेशन परिसर, रेल्वे स्थानक सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, प्रगतीनगर, ओसवाल नागरी, मोरगाव, आचोले रोड, संयुक्त नगर, विजय नगर, शिर्डी नगर, आचोले गाव, संतोषभूवन, बिलालपाडा, धणीवबाग, नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्थ, पाठणकार पार्क, स्टेशन परिसर, वसई पूर्व ते वसई फाटा, नवघर, एव्हरशाईन, वसंत नगरी, विशाल नगर, सातीवली, नवजीवन, भोयदापाडा, गोखीवरे, वसई पश्चिम स्टेशन परिसर ,आनंद नगर, समता नगर, माणिकपूर, चुलने, गास, सनसिटी, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, बोलींज, गावठाण, यशवंत नगर, विराट नगर, विरार पूर्व विवा जहांगीड परिसर हा सर्व जलमय झाला होता.

दुकानदारांचं मोठं नुकसान

या सर्व परिसरात सोसायटी, मुख्य रस्ते, औद्योगिक वसाहत, पाण्याखाली जाऊन कंबर इतके ते छाती इतके पाणी साचले होते. रात्री दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांना सामानही बाहेर काढायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चाळीतील घरांमध्ये पाणी शिरलं, 80 नागरिकांची सुटका, अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कता

विरार पूर्व, कनेर फाटा जाधव नगर येथील मध्यरात्री भर झोपीत अचानक मुसळधार पावसाला सुरवात होऊन काही न कळण्याच्या आत सर्वत्र हाहाकार माजला होता. कनेर फाटा जाधव नगर येथील बाजूचा नाला तुडुंब भरून, सर्व पाणी चाळीतील घरात शिरले होते. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. मध्यरात्री वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 च्या सुमारास घटनास्थळी पोहोचून 80 नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढले आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी दोरच्या साहाय्याने 20 लहान मुलं, 25 बायका, 3 गरोदर बायका, 30 पुरुष आणि 7 ते 8 शेळ्या बकरी ह्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशन 3 च्या सुमारास चालू करून 5 वाजेपर्यंत चालले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

वसई च्या मिठागर मध्ये 400 लोकांची वस्ती आहे. या वस्तीला पूर्ण पाण्याने वेडा टाकला होता. पाण्याची पातळी जस जशी वाढत होती तसे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगात होते. सकाळी पाऊस थांबला पण लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं जे ओसरत नव्हते. अनेकांनी आपले सामान छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढले आहे. मिठागर मधील घरात पाणी शिरुन सर्वाधिक फटका लोकांना बसला आहे.

(Vasai Virar heavy Rain Update only 2 hour 181 mm Rain)

हे ही वाचा :

Vasai Rain | वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार, रस्ते जलमय, जाधव पाड्यात 80 रहिवाशांची सुटका

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.