AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 22,483 कुटुंबीय जगताहेत जीवमुठीत घेऊन, 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही; धक्कादायक माहिती उघड

चेंबूर-वाशीनाका येथे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांच्या घरावर दरड कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Chembur- Vashi-naka landslide)

मुंबईत 22,483 कुटुंबीय जगताहेत जीवमुठीत घेऊन, 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही; धक्कादायक माहिती उघड
landslide in mumbai
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 3:51 PM
Share

मुंबई: चेंबूर-वाशीनाका येथे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांच्या घरावर दरड कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत 22, 483 कुटुंब जीवमुठीत घेऊन डोंगराळ भागात राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच गेल्या दहा वर्षांपासून डोंगराळ भागात दरडी कोसळू नये म्हणून सरकारने कोणतीही उपाययोजना केली नसल्याची माहितीही उजेडात आली आहे. (22,483 slumdwellers living in landslide-prone areas in Mumbai)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे. मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाणं डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहेत. या भागातील 22,483 झोपड्यांपैकी 9657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली होती. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते, असे सांगतानाच आपण पावसाळयात मुंबईत 327 भूस्खलन होऊ शकते हे आपण आधीच सरकारला सांगितलं होतं, असं अनिल गलगली यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत 290 बळी

1992 ते 2021 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 290 लोकांनी जीव गमावला आहे. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्‍या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने डोंगराळ भागातील नागरिकांचं स्थलांतर करण्याची शिफारस केली होती. त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांचे दुर्घटनेत प्राण गेले नसते, असं त्यांनी सांगितलं.

अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅनच तयार नाही

मंडळाच्या अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली आहेत, परंतु नगरविकास विभागाने त्याची अद्याप अमलबजावणी केली नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणताही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलाच नाही, असा दावा गलगली यांनी केला. (22,483 slumdwellers living in landslide-prone areas in Mumbai)

संबंधित बातम्या:

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

(22,483 slumdwellers living in landslide-prone areas in Mumbai)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!