AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जब डांस हो जाए आऊट ऑफ कंट्रोल..! ‘हा’ Video पाहून डोळ्यांतून पाणी येईल, पण हसून हसून…

Funny dance : आम्‍ही तुम्‍हाला डान्‍सचा असा अजब व्हिडिओ दाखवणार आहोत, जे पाहून तुमच्या डोळ्यांतून पाणी येईल. ड्रमचा (Drum) आवाज ऐकून एका व्यक्तीचे भान हरपल्याचे या व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. यानंतर तो जमिनीवर लोळत बेभान होतो.

जब डांस हो जाए आऊट ऑफ कंट्रोल..! 'हा' Video पाहून डोळ्यांतून पाणी येईल, पण हसून हसून...
ड्रमचा आवाज ऐकल्यानंतर बेफान होऊन नाचणारा युवकImage Credit source: Instagram
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 30, 2022 | 2:02 PM
Share

Funny dance : तुम्ही सोशल मीडियावर डान्सचे मजेदार व्हिडिओ पाहिले असतील. असे अनेक व्हिडिओ आहेत जे बघायला मजा येते. त्याचवेळी, काही व्हिडिओ पाहिल्यानंतर, डान्सरचे कौतुकही करावेसे वाटते. आज आम्‍ही तुम्‍हाला डान्‍सचा असा अजब व्हिडिओ दाखवणार आहोत, जे पाहून तुमच्या डोळ्यांतून पाणी येईल, पण हसून हसून… ड्रमचा (Drum) आवाज ऐकून एका व्यक्तीचे भान हरपल्याचे या व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. यानंतर तो जमिनीवर लोळत बेभान होऊन काहीतरी करू लागतो, जे पाहून तेथे असलेले लोक खूप घाबरतात. कुठल्यातरी कार्यक्रमानिमित्त अनेकजण रस्त्यावर जमल्याचे पाहायला मिळते. ढोल वाजवणारे लोकही आहेत. तो ढोल वाजवायला सुरुवात करताच अचानक मधोमध एक माणूस येतो आणि जमिनीवर लोळत डान्स करतो.

थांबायला तयारच नाही…

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती व्यक्ती जमिनीवर लोळत ड्रमच्या आवाजावर नाचू लागते. सुरुवातीला जेव्हा लोक त्याला पाहतात, तेव्हा ते खूप घाबरतात. लोकांना असे वाटते, की त्याला काहीतरी झाले आहे. त्या व्यक्तीकडे पाहून असे वाटत नाही की तो नाचत असेल, पण वास्तवात तो नाचतच आहे. आपण पाहू शकता, की बरेच लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ती व्यक्ती थांबत नाही आणि जोरदार नाचत राहते. व्हिडिओ पाहा –

इन्स्टाग्रामवर शेअर

जेव्हा लोकांना कळते, की ती व्यक्ती नाचत आहे, तेव्हा त्यांची काळजी दूर होते. व्हिडिओमध्ये अशाप्रकारे नाचणाऱ्या व्यक्तीला पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही. असा डान्स व्हिडिओ तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. memecentral.teb नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की आतापर्यंत हजारो लोकांनी त्याला लाइक केले आहे.

आणखी वाचा :

11 मजले, स्विमिंग पूल आणि बरंच काही…; बिकारनेमधलं पक्ष्यांसाठीचं ‘हे’ अपार्टमेंट पाहिलं का?

Chimpanzee dance video : आता चिंपांझीलाही आवरला नाही मोह; ‘श्रीवल्ली’वर असा काही डान्स केली, की यूझर्स खूश!

Shocking video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 3 सेकंदांत कोसळली 5 मजली इमारत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली