माझ्या नवऱ्याची बायको.. मुलगी शोधली अन् नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं, प्रसिद्ध गायिकेच्या धाडसी निर्णयाने सर्वांनाच धक्का

42 वर्षीय मलेशियन गायिका एजलाइन अरिफिन सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. तिने गेल्यावर्षी तिच्या नवऱ्याचं लग्न लावून दिलं. नवऱ्यासाठी तिने स्वत: मुलगी शोधली आणि दोघांचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं. एजलाइनच्या या धाडसी निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण तिने तिच्या या निर्णयाचं समर्थनही केलंय. आपण हा निर्णय का घेतला याची माहितीच तिने दिली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको..  मुलगी शोधली अन् नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं, प्रसिद्ध गायिकेच्या धाडसी निर्णयाने सर्वांनाच धक्का
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 3:14 PM

जगात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. एखादीच अशी महिला असू शकते की जी नवऱ्याचं दुसरं लावून देईल. हे वाक्य वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल. पण ते खरं आहे. मलेशियातील एका प्रसिद्ध गायिकेने थेट नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं. विशेष म्हणजे तिनेच नवऱ्यासाठी दुसरी बायको शोधली आणि दोघांचा संसार थाटून दिला. हे करताना तिने दिलेलं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या गायिकेचं कौतुक करावं की तिच्या या निर्णयाला वेडेपणा म्हणावा असा प्रश्न मलेशियातील जनतेला पडला आहे.

एजलाइन अरिफिन असं या गायिकेचं नाव आहे. ती 42 वर्षाची आहे. एजलिन या नावाने ती लोकप्रिय आहे. 2003मध्ये आवांटा-गार्डे हाय हाय बाय बाय… या गाण्यामुळे ती देशात लोकप्रिय ठरली होती. तिचे इन्स्टाग्रामवर 173,000 फॉलोअर्स आहेत. गेल्या दोन वर्षापासून तिचं कोणतंही नवं गाणं आलं नाही. तरीही ती सुके शॉप सारख्या मलेशियन टेलिव्हिजन शॉपिंग चॅनलवर सक्रिय आहे. एजलिन सध्या तिच्या चाहत्यांना फूड प्रोडक्ट्स विकते.

दुसरी पत्नी नवऱ्यासोबत राहील…

एजलिनने तिच्या आयुष्यातील एक मोठा धाडसी निर्णय घेतला. तिने पती वान मोहम्मद हफीजम यांचा गेल्या वर्षी 26 वर्षीय तरुणीशी दुसरा विवाह लावून दिला. मोठ्या थाटात तिने नवऱ्याचं लग्न लावून दिलं. नवऱ्याचं लग्न लावून देण्याची माझीच आयडिया होती, असं तिने म्हटलंय. दुसरी पत्नी नवऱ्यासोबत राहील. त्याची काळजी घेईल. त्यामुळे मी माझ्या करिअरवर फोकस ठेवेल. माझ्या करिअरला पुढे नेईन, त्यासाठीच मी हा निर्णय घेतल्याचं एजलिन म्हणाली.

आम्ही अजूनही सोबत आहोत…

मी एक व्यस्त व्यक्ती आहे. मला कामानिमित्ताने दूरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे मी नेहमी त्रस्त होते. मला घरातील कामासाठी कुणाच्या तरी मदतीची गरज होती, असं तिने म्हटलंय. 31 मार्च रोजी एजलिनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. त्यात तिने नवऱ्याचा एक फोटो पोस्ट केलाय आणि आम्ही अजून सोबत आहोत. आणि एकमेकांशी मजबूतीने जोडलो गेलोय, असं तिने म्हटलंय.

बहुविवाह योग्य नाही

नवऱ्यासाठी योग्य वधू शोधण्यासाठी तिने अनेक मॅचमेकिंग कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर अखेर तिच्या नवऱ्याला योग्य वधू मिळाली. आम्ही दोघीही नवऱ्यासोबत आठवडा आठवडा भर राहतो, असं एजलिनने म्हटलंय. आम्ही स्त्रीया आहोत, त्यामुळे एकमेकींचा हेवा वाटतो. पण जर माझ्यासाठी नवरा त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो आणि योग्य देखभाल घेऊ शकतो तर महिलांनाही त्या शेअर करण्यात काही अडचण नसली पाहिजे, असं सांगतानाच बहुविवाह सर्वांसाठीच योग्य नाही, असं तिने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....