नव्या वर्षात नवा कायदा, भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांची आता काही खैर नाही,थेट ही कारवाई होणार

शहरात काही अशी कुटुंबे आहेत जी वारंवार या प्रकरणात पकडल्यानंतर पुन्हा - पुन्हा भिक मागत आहेत. या मोहिमेत अशा निर्ढावलेल्या लोकांवर देखील करडी नजर ठेवली जाणार असल्याचे कलेक्टर आशीष सिंह यांनी सांगितले.

नव्या वर्षात नवा कायदा, भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांची आता काही खैर नाही,थेट ही कारवाई होणार
beggars
| Updated on: Dec 16, 2024 | 5:52 PM

अनेकदा आपण दया येऊन ट्रॅफीक सिग्नल किंवा लोकल ट्रेनमध्ये भिक मागणाऱ्यांच्या हातावर पैसे टेकवतो. परंतू हे पैसे घेऊन भिकारी मात्र गब्बर होत असतात. अनेकदा हातपाय धडधाकट असलेले भिकारी देखील नाटक करुन पैसे मागताना दिसत असतात. देशातील मध्य प्रदेशात मात्र आता भिकाऱ्यांना दानधर्म करणाऱ्यांवर आफत येणार आहे. मध्य प्रदेशातील इंदौर शहराने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. इंदौर शहराला भिकारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जानेवारी २०२५ पासून भिक मागणाऱ्यांवर थेट एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा कलेक्टर आशीष सिंह यांनी या संदर्भात भिक मागणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय याआधीच जाहीर केल्याचे म्हटले आहे

मध्य प्रदेशात पर्यटक वाढण्यासाठी हे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी भिक्षेकऱ्यांना हटविण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेकदा भिक्षेकऱ्यांना भिक्षा देणाऱ्यांची प्रवृत्ती या प्रकारांना वाढविण्यास प्रवृत्त करीत असतात. त्यामुळे भिक देणाऱ्यांवरच थेट ( FIR )  एफआयआर दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ‘भिक मागण्याच्या विरोधात आमची मोहीम या महिन्याच्या ( डिसेंबर ) अखेर पर्यंत चालू राहणार आहे. जर कोणी व्यक्ती १ जानेवारीपासून कोणा भिकाऱ्याला भिक देताना सापडला तर त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाईल असे इंदौरचे कलेक्टर आशीष सिंह यांनी सांगितले. आपण इंदौरवासियांना आवाहन करत आहोत की लोकांना भिक देऊन पापाचे भागीदार बनू नका असेही त्यांनी सांगितले.

भीक मागणाऱ्याकडे ७५ हजार रुपये सापडले

जिल्हा प्रशासनाने अलिकडेच भीक मागण्यासाठी मजबूर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच भीक मागणाऱ्या अनेक व्यक्तींचे पुनर्वसन देखील केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने देशातील दहा शहरांना भिकारी मुक्त करण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरु केला आहे. ज्यात इंदौर देखील सामील आहे. इंदौर शहर भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाच्या टीमनी गेल्या काही दिवसात १४ भिक्षेकऱ्यांवर कारवाई केलेली आहे. या कारवाईत राजवाडा येथील शनिमंदिराजवळ भीक मागणाऱ्या एका महिलेकडे ७५ हजार रुपये सापडले आहेत. तिने हे पैसे भीक मागून केवळ १० ते १२ दिवसात कमावले होते.