
रस्त्यावर टवाळकी करणाऱ्या तरुणांमुळे अनेकदा भांडणं झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटनामध्ये तरुणांना मारहाण होण्याचे प्रकार घडले आहेत. परंतू मध्य प्रदेशात फ्लाईंग किस दिल्याच्या आरोपावरुन दोन्ही गटात जबर हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आधी या तरुणीच्या नातेवाईकांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप असलेल्या तरुणांची बाईक अडवून त्यांना चोपले. त्यानंतर या आरोपींच्या नातेवाईकांनी तरुणीच्या नातलगांना मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील अमझेरा येथील हा व्हिडीओ आहे. येथे फ्लाईंग किस (Flying Kiss) दिल्याचा आरोप करणाऱ्या तरुणींच्या नातेवाईकांनी बाईकवरुन जाणाऱ्या अडवले आणि नंतर त्यांची जोरदार धुलाई केली. त्यानंतर पीडीत तरुणींच्या नातेवाईकांना आरोपींच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे.
ही घटना अमझेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बाईकवरुन जाणाऱ्या तरुणांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणीला फ्लाईंग किस दिला. त्यानंतर चिडलेल्या तरुणीने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने या तरुणांची बाईक अडवली. त्यानंतर या तरुणीच्या नातेवाईकांनी या तरुणांना बेदम मारहाण केली.
त्यानंतर आरोपी युवकांनी देखील त्यांच्या लोकांना बोलावले आणि पीडीत पक्षाच्या नातेवाईकांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच अमझेरा पोलिसांनी लागलीच घटनास्थळी दाखल होत कारवाई केली. अमझेरा पोलिसांनी दोन्ही पक्षांची तक्रार नोंदवत एकूण १५ लोकांवर केस दाखल केली आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओचा पुरावा म्हणून वापर करुन त्या आधारे तपास सुरु केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
यह वीडियो viral है..
धार जिले के amjhera मे एक युवक की हरकत ने बड़ा बवाल कर दिया, दरअसल युवक ने रास्ते मे जा रही एक युवती को flying kiss कर दिया उसके बाद ल़डकि के घरवालों ने बाइक रोककर जमकर पिटाई की ।
अपने ज़ज्बात को काबू मे रखो नहीं तो लतियाए जा सकते हो। pic.twitter.com/AowHyXLMVS
— Shailesh Yadav (@Shailes34135660) October 13, 2025
युपीत काही वर्षांपूर्वी चाट विकणाऱ्यांची हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मध्य प्रदेशातील हा व्हिडीओ देखील असाच व्हायरल झाला आहे. यातही दोन्ही गट चाटवाल्या व्हिडीओ प्रमाणेच एकमेकांशी भिडल्याचे दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओ खूप पाहिले जात आहे.