AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांचे नवे गाणे

माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या. (Amruta Fadnavis New Song Women's Day)

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी... अमृता फडणवीस यांचे नवे गाणे
महिला दिनी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 05, 2021 | 3:46 PM
Share

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. येत्या महिला दिनी त्यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्यामुळे मिसेस फडणवीसांच्या चाहत्यांची उत्कंठा ताणली गेली आहे. (Former CM Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis New Song on Women’s Day)

“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी….. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही !’स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे.

ट्रोलर्सना इशारा

आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या. (Former CM Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis New Song on Women’s Day)

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

अमृता फडणवीसांच्या गळ्यात ‘जॅझ’ सुरावट

अंधार’ या आगामी चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी याआधी एक गाणं (Andhaar Daav Movie Song) गायलं होतं. जीत गांगुली यांनी अंधार चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. जॅझ संगीत पद्धतीचं हे गाणं आहे. ‘रोज रोज पाठीमागे सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ही कोणाची’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

‘तिला जगू द्या’ची वाहवा

अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

संबंधित बातम्या:

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

VIDEO: अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का?

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय, अमृता फडणवीसांचा इशारा कोणाला?

(Former CM Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis New Song on Women’s Day)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…