व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर भाजप आमदार महेश लांडगे यांनी कमेंट केली आहे. | BJP MLA Mahesh Landage Comment on Amruta Fadanvis Song

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, 'नाईस व्हॉइस...!'
अमृता फडणवीस आणि महेश लांडगे
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 1:47 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं काल व्हॅलेन्टाईनं औचित्य साधून रिलीज झालं. अगदी काही वेळात हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. अनेकांनी या गाण्यावर कमेंट केल्या. पुण्यातील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनीही अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर लक्ष वेधून घेणारी कमेंट केली आहे. (BJP MLA Mahesh Landage Comment on Amruta Fadanvis Song)

आमदार महेश लांडगे यांची कमेंट

‘ये नयन डरे डरे’ असे अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचा प्रोमो त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला होता. ज्यावर आमदार लांडगे यांनी कमेट केली आहे. ‘व्हॉट अ साँग…. नाईस व्हाइस’, अशी लक्ष वेधून घेणारी कमेंट आमदार लांडगे यांनी केली आहे.

mahesh landage Comment Amruta Fadanvis Song

आमदार महेश लांडगे यांची कमेंट

आमदार लांडगे यांनी कमेंट केलेलं अकाऊंट त्यांचं व्हेरिफाईड अकाऊंट नाही. परंतु त्यांच्या या अकाऊंटला 79 हजार फॉलोवर्स आहेत. तर याच अकाऊंटला त्यांनी स्वत:चा बायो लिहिताना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून उल्लेख केलाय. त्यांचे स्वत:चे तसेच मित्रपरिवाराचे फोटोही त्यांनी या अकाऊंटवरुन शेअर केलेले दिसून येत आहेत.

व्हॅलेंटाईनचं औचित्य साधून अमृतांचं गाणं

अमृता फडणवीस यांनी हे गाणं पोस्ट करताना हे आपलं आवडतं गाणं असल्याचं म्हटलं आहे. मी माझ्या व्हॅलेंटाईनसोबत आ़नंदी आहे, असं म्हणत त्यांनी दिलखेचक अंदाजात नवीन गाणं प्रेक्षकांच्या समोर आणलंय. ज्यावर कानसेन रसिकांनीही हजारो कमेंट केल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

हे ही वाचा :

VIDEO: अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.