AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: पायाने कार पार्क करणारी ‘वंडर वूमन’, लोक म्हणाले, ही आयडीया कार बनवणाऱ्यांनाही आली नसेल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या कारमध्ये बसलेली दिसते आणि काही सेकंदांनंतर ती तिची कार पार्क करते. व्हिडिओमध्ये, ती हळू हळू तिचा एक पाय कारच्या सीटच्या मागे घेते आणि काही सेकंदांनंतर तिचा पाय डिग्गीमधून बाहेर येताना दिसतो.

Viral Video: पायाने कार पार्क करणारी 'वंडर वूमन', लोक म्हणाले, ही आयडीया कार बनवणाऱ्यांनाही आली नसेल
पायाने गाडी पार्क करणारी वंडर वूमन
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:20 AM
Share

सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ आहे जिथं कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असे काही व्हिडीओ आहेत जे इंटरनेटवर येताच धुमाकूळ घालतात. जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या कलेचा वापर करत असं काही भन्नाट करतात की, डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला कारमध्ये दिसत आहे आणि ती तिची कार अशा अनोख्या पद्धतीने पार्क करते की व्हिडिओ पाहून सगळे हसत-हसत राहतात. ( Funny Viral Video in which You will laughed after seeing the new style of car parking of women)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या कारमध्ये बसलेली दिसते आणि काही सेकंदांनंतर ती तिची कार पार्क करते. व्हिडिओमध्ये, ती हळू हळू तिचा एक पाय कारच्या सीटच्या मागे घेते आणि काही सेकंदांनंतर तिचा पाय डिग्गीमधून बाहेर येताना दिसतो. जेव्हा तिचा पाय बाहेर येतो, तेव्हा ती कारमधून थोडाशी बाहेर येते, जेणेकरून तिचा पाय भिंतीवर राहिल आणि त्याला कार आणि भिंतीमध्ये जागा राहिल.

आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडीओ hepgul5 नावाच्या पेजवर पाहू शकता. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की, ते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट लिहिले, ‘हा व्हिडिओ खरोखरच अप्रतिम आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘ही पद्धत सोपी आहे, पण भाऊ असे कोण करतो,’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा व्हिडिओ खूपच विचित्र आहे आणि कुणाचा पाय डिग्गीच्या बाहेर जाऊ शकतो’ या व्हिडिओवर बरेच इमोटिकॉन्स देखील दिसत आहेत.

हेही पाहा:

तरुणाचा जीव तोंडात आणणारा स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील, पाहा व्हिडीओ!

Video: स्कूटीवर भयानक स्टंट, तोल गेला आणि जीव जाता जाता राहिला, पाहा स्टंटचा लोटपोट करणारा व्हिडीओ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.