Viral video : 3Dवरून थेट 8D! सेटअप असा काही बिघडला, की मुलगी थेट जमिनीवर…

Girl funny video : एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी थ्रीडी (3D) सीटवर बसलेली दिसत आहे, यासाठी मुलीने खास चष्माही लावला आहे, पण सीट फिरताच संपूर्ण सेटअप बिघडतो.

Viral video : 3Dवरून थेट 8D! सेटअप असा काही बिघडला, की मुलगी थेट जमिनीवर...
3d खुर्चीवरून पडली मुलगी
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Mar 10, 2022 | 11:45 AM

Girl funny video : इंटरनेटवर विनोदी व्हिडिओंचा महापूर आला आहे. हे व्हिडिओ पाहून पोट धरून आपल्याला हसायला येईल. याच प्रकारात एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. जे पाहून तुम्हीही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. या क्लिपला 24 तासांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ केवळ 7 सेकंदांचा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी थ्रीडी (3D) सीटवर बसलेली दिसत आहे, यासाठी मुलीने खास चष्माही लावला आहे, पण सीट फिरताच संपूर्ण सेटअप बिघडतो. तुम्ही म्हणू शकता की खुर्चीने मुलीला 3D विश्वातून थेट 8Dच्या जगात नेले.

ट्विटरवर शेअर

@staycjerry नावाच्या अकाऊंटवरून हा मजेदार व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत, म्हणूनच या क्लिपला 6.4 मिलियन व्ह्यूज म्हणजेच 64 लाख, 78.6 हजार रिट्विट्स आणि 4 लाख 62 हजार लाइक्स मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या जात आहेत.

‘क्षणात उलटले’

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक यूझर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूझरने म्हटले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माझ्या हसण्यावर कंट्रोल करता येत नाही.” तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की क्षणात जग उलटले! मजेदार कमेंट.

आणखी वाचा :

चिमुकल्यानं आईला ओळखलंच..; आतापर्यंतचा Cute video अजिबात miss करू नका

Viral : काय जबरदस्त साधलंय संतुलन! पुन्हा पुन्हा पाहावा असा Stunt video

Viral video : लग्नात सजावटीसाठी ठेवले होते कारंजे, बघा लोकांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें