सिंगल लोकांची चिंता मिटली ! आता भाड्याने मिळणार गरबा पार्टनर; पोस्ट सोशल मीडियावर Viral

नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी पार्टनर शोधण्याची चिंता आता मिटली? सोशल मीडियावर सध्या ‘Rent a Garba Partner’ची पोस्ट चर्चेत आहे. यात ₹1000 पासून वेगवेगळी पॅकेजेसची ऑफर

सिंगल लोकांची चिंता मिटली ! आता भाड्याने मिळणार गरबा पार्टनर; पोस्ट सोशल मीडियावर Viral
garba partner on rent post viral
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 4:54 PM

हळूहळू गणपती आपल्या गावाला जातील. त्यानंतर नऊ दिवस नवरात्रीचे आणि गरब्याचे रंग चढायला सुरूवात होईल. नवरात्रीत गरबा हा पार्टनर सोबत खेळायला खूप मज्जा येते. खरंतर तो पार्टनर सोबतच खेळायचा खेळ आहे. यामुळे प्रत्येक जण पार्टनरच्या शोधात निघालेले असतात. काहींना गरबा खेळतानाच पार्टनर मिळून जातो तर काही लोका पार्टनर मिळेल या आशेवर कायम असतात. पण यावर्षी पार्टनर शोधायची ती कटकट, मेहनत नसणार आहे. याच कारण म्हणजे तुम्हाला सहजच भाड्याने पार्टनर मिळणार आहे.

१००० पासून पार्टनरचे पॅकेज सुरू

व्हायरल पोस्टमध्ये गरबा पार्टनरसाठी तीन वेगवेगळी पॅकेज देण्यात आली आहेत. Silver पॅकेजची किंमत १००० रुपये आहे. यामध्ये दोन तास गरबा, मॅचिंग आउटफिट, बेसिक गरबा स्टेप्स शिकवणे आणि सेल्फीचा समावेश आहे, म्हणजे गरब्याला जाण्यापूर्वी पार्टनर शोधण्याची धावपळचं संपली म्हणायची

Gold पॅकेजमध्ये काय?

Gold पॅकेजसाठी १५०० रूपये मोजावे लागतील. यामध्ये चार तास गरबा खेळण्यासोबत मॅचिंग आउटफिट, रिल्स आणि फोटो काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. एवढंच नाही तर दोघांची ओळख कशी झाली याची बनावट स्टोरीही या पॅकेजमध्ये असल्याचं पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Platnium पॅकेज तर भारीच

सगळ्यात महागडं Platinum पॅकेज २००० रूपयांचं आहे. यामध्ये पुर्ण दिवस गरबा, गरबादरम्यान डान्स स्टेपची मदत, दुपट्टा आणि झुमके सांभाळण्यापासून ते घरी सुरक्षित सोडण्यापर्यंतच्या सुविधा देण्यात आल्याचं पोस्टमध्ये लिहिले आहे.

सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनीहीी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी लग्नासाठी भाड्याने मिळण्याची काही ऑफर आहे का अश्या कमेंट्स केल्या आहेत. पुर्ण दिवस ही ऑफर मिळू शकते का? तर काही लोकांनी कमेंट्समध्ये आपल्या भरपूर सिंगल मित्रांना टॅग केले आहे.या पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी पार्टनर न मिळण्याची चिंता करणाऱ्यांसाठी ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us