बॉलिवूडच्या वादग्रस्त गाण्यानंतर आता गौतमीचा सर्वात सुपरहिट गाण्यावर डान्स, स्टेप अशा की बघतच राहाल

बॉलिवूडच्या वादग्रस्त गाण्यावर डान्सनंतर आता गौतमी पाटीलचा ऐश्वर्या रायच्या सर्वात सुपरहिट गाण्यावर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये धडाकेबाज डान्स. व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

बॉलिवूडच्या वादग्रस्त गाण्यानंतर आता गौतमीचा सर्वात सुपरहिट गाण्यावर डान्स, स्टेप अशा की बघतच राहाल
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 02, 2026 | 3:01 PM

Gautami Patil Video : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील ही गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर तिच्या हटके डान्स स्टेप आणि धडाकेबाज डान्समुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता ती पुन्हा एकदा आपल्या दमदार डान्समुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त ‘छोली के पीछे क्या है’ ह्या गाण्यावर डान्स केल्यानंतर तिच्या या डान्सची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. अशातच आता तिने अभिनेत्री ऐश्वर्या रायवर चित्रित झालेल्या सुपरहिट ‘सावन ने आज तो मुझको भिगो दिया’ या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. तिच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलने गुलाबी रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये नैसर्गिक वातावरणात डान्स केला आहे. पावसाळी वातावरण, मनमोहक लोकेशन आणि तिच्या दमदार डान्स शैलीमुळे हा व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. तिच्या प्रत्येक हावभावाला आणि स्टेप्सना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

गौतमी पाटीलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 70 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हजारो नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे तिच्या डान्सचे कौतुक केले आहे. अप्रतिम परफॉर्मन्स, खूप सुंदर डान्स, नेहमीप्रमाणे जबरदस्त अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून पाहायला मिळत आहेत.

या गाण्याचे प्रचंड चाहते

गेल्या काही दिवसांपासून ‘सावन ने आज तो मुझको भिगो दिया’ हे गाणं सोशल मीडियावर विशेष ट्रेंडमध्ये आहे. तरुणाईपासून ते विविध वयोगटातील संगीतप्रेमींमध्ये या गाण्याची लोकप्रियता कायम असून, अनेक जण पर्यटनस्थळी किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेल्यानंतर या गाण्यावर रील्स तयार करताना दिसतात. त्यामुळे या गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून गौतमी पाटीलच्या नव्या डान्स व्हिडीओमुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली आहे.

दरम्यान, गौतमी पाटील आपल्या वेगळ्या डान्सशैलीमुळे आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा प्रत्येक नवा व्हिडीओ चाहत्यांकडून मोठ्या उत्सुकतेने पाहिला जात असून, यावेळीही तिच्या या सादरीकरणाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us