
भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गल्लीबोळात भांडताना, रस्त्यावर भांडताना, बाजारात भांडताना. पण हे बरेच व्हिडीओ मुलांचे असतात, माणसांचे असतात. सगळेच नाही पण बरेच! मुलींचा व्हिडीओ पाहिलाय का गॅंग बनून मारामारी करतानाचा? त्यात पण तो व्हिडीओ सार्वजनिक ठिकाणचा असावा असा व्हिडीओ? नाही ना? एक व्हिडीओ आहे जो जबरदस्त व्हायरल होतोय. पोरींची टोळी आहे. ए धपाधप मारामारी करतीये, तेही काठ्या घेऊन!
भांडणं ही चांगली गोष्ट नाही, असं घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात. हे प्रकरण गँगवॉरचं आहे. इथे मुली अक्षरशः लाथा बुक्क्यांनी एकमेकींना मारतायत.
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, मुलींच्या दोन टोळ्या एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. या मुली त्यांच्या भांडणाच्या वेळी काठ्यांचा वापर देखील करतात.
28 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे, जो 57 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 1600 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
Kalesh B/w Two Group Of Girls pic.twitter.com/Wm12xOMiFb
— r/Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 18, 2022
252 हून अधिक लोकांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठून आला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.