AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा चिरण्याचे देशी जुगाड पाहिलं का? हसू आवरणार नाही!

यात काहीच शंका नाही की देशी जुगाडांच्या (Desi Jugaad) बाबतीमध्ये भारतीय लोकांचा कोणची हात धरू शकत नाही. भारतीय लोक देशी जुगाड करून कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यात जगात आघाडीवर आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की विदेशी नागरिक देखील आता देशी जुगाडाच्या बाबतीमध्ये मागे राहिलेले नाही.

कांदा चिरण्याचे देशी जुगाड पाहिलं का? हसू आवरणार नाही!
देशी जुगाड
| Updated on: Feb 08, 2022 | 5:10 PM
Share

Viral video : यात काहीच शंका नाही की देशी जुगाडांच्या (Desi Jugaad) बाबतीमध्ये भारतीय लोकांचा कोणची हात धरू शकत नाही. भारतीय लोक देशी जुगाड करून कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यात जगात आघाडीवर आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की विदेशी नागरिक देखील आता देशी जुगाडाच्या बाबतीमध्ये मागे राहिलेले नाही. आज तुम्हाला आम्ही असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. जे जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ (Viral video) सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी एक जुगाड करते. या महिलेने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये, यासाठी चक्क एक काचेचे झाकण आपल्या तोंडाला लावले आहे. हा व्हिडीओ पाहून युझर्स आपले हसू आवरू शकत नाहीत.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका घरामध्ये पती पत्नी आहेत. पती कांदा चिरण्याची तयारी करत आहे. किचन ओट्यावर एक अर्धा चिरलेला कांदा पडलेला आहे. संबंधित महिलेच्या हातात चाकू आहे. महिला हा कांदा चिरणार आहे. मात्र सर्वांनाच माहित आहे की, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते. कांदा चिरताना डोळ्यांना प्रचंड वेदना होतात. हे टाळण्यासाठी महिलेने मोठ्या कल्पकतेने एक देशी जुगाड शोधून काढले आहे. तीने कांदा चिरताना डोळ्यातू पाणी येऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्याच्या मापाचे एक काचेचे झाकण आपल्या तोंडाला मास्कसारखे घट्ट लावले आहे. यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येणे तर बंद झाले, सोबतच या काचेच्या तुकड्यामधून बाहेरचे सर्व दिसत असल्यामुळे तिला कांदा देखील चिरता आला. या महिलेचे जुगाड पाहून तिच्या पतीने जी प्रतिक्रिया दिली ती पाहून तुम्हाला देखील हसू येईल.

लाईक आणि कमेंटसचा पाऊस

हा व्हिडीओ hepgul5 नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संबंधित युजरने त्याला समर्पक असे कॅप्शन देखील दिले आहे. कांदा चिरताना होणाऱ्या वेदनेचा अचूक उपाय असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत असून, या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 13 हजार लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटसचा पाऊस पडत असून, नेटकरी देखील या व्हिडीओवर गमतीशीर कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 ?? (@hepgul5)

संबंधित बातम्या

Lion Video : …अन् सफारीदरम्यान अचानक जंगलाचा राजा आला समोर…

Funny Viral Video : चिमुरड्यानं घेतला मेंढराशी पंगा, मग बसला ‘असा’काही दणका…

Viral : ‘हे’ Aadhar Card नाही, लग्नपत्रिका आहे! छत्तीसगडच्या ‘या’ नवरदेवानं बनवलं अनोखं डिझाइन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली