AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horse swimming : घोड्याला कधी पोहताना पाहिलंय का? नसेल तर ‘हा’ Video तुमच्यासाठी आहे…

Animal video : कधी घोड्याला (Horse) पोहताना (Swimming) पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की पाहा. घोडे पोहू शकतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Horse swimming : घोड्याला कधी पोहताना पाहिलंय का? नसेल तर 'हा' Video तुमच्यासाठी आहे...
स्विमिंग पूलमध्ये ऐटीत पोहणारा घोडाImage Credit source: Instagram
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Mar 23, 2022 | 1:27 PM
Share

Animal video : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. स्वत:ला थंड राहण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी जुगाड करत असतो. उन्हाळ्यात सर्वांचे पाय वळतात, ते स्विमिंग पूलकडे. स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर आपले पोहण्याचे कौशल्य दाखवणार अनेकजण आहेत. हे झाले माणसाचे. पण प्राणीही पोहत असतात. काही प्राण्यांना पाण्यातच राहायला आवडते. तर काही प्राणी कधी कधी पाण्यात जातात. तुम्ही कधी घोड्याला (Horse) पोहताना (Swimming) पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की पाहा. घोडे पोहू शकतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. घोड्यांची खोल पाण्यात पोहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. पाण्यात प्रवेश केल्यानंतर, घोडे त्यांचे पाय पॅडलसारखे हलवतात, ज्यावरून ते पोहतात. घोडे त्यांच्या विशाल फुफ्फुसांमुळे पोहण्यास सक्षम आहेत.

घेतोय पोहण्याचा आनंद

घोडे पाण्याखाली श्वास घेण्यास असमर्थ असल्याने ते नैसर्गिकरित्या त्यांचे डोके पाण्याच्या वर ठेवतात. त्यांचे तोंड आणि नाक पाण्याच्या वर ठेवल्याने त्यांना श्वास घेण्यास मदत होते. तथापि, जेव्हा घोडा पाण्याखाली असतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि जड श्वास घेण्याची शक्यता असते. पोहणे घोड्यांसाठी फायदेशीर आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तपकिरी घोडा तलावात पोहताना दिसत आहे. घोडा त्याच्या पोहण्याचा आनंद घेत असल्याचे दिसते आणि तो कॅमेराकडेही पाहत आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट

naturre‘ पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्याला 4,400हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. घोडा पोहताना पाहून नेटिझन्सला धक्का बसला आणि त्यांना वाटले की हे विचित्र दृश्य आहे. एका यूझरने लिहिले, की मी माझ्या आयुष्यात कधीही घोडा पोहताना पाहिला नाही.’ दुसर्‍या यूझरने लिहिले, की पोहणारा घोडा पाहणे खूप सुखदायक वाटते. इतर अनेक यूझर्सनीही कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

आणखी वाचा :

Ice skating : एकाचवेळी स्केटिंग आणि बॅकफ्लिप, तेही बर्फावर..! पाहा, मुलीचा Viral video

Bijlee Bijlee गाण्याची परदेशातही Craze; Violin वाजवून मुलीनं वेधलं सर्वांचं लक्ष

रस्त्यावरून चालणाऱ्यांसोबत केला असा काही प्रँक, महिलांचे खावे लागतायत बोलणे; Video viral

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली