IAS Officer ने पोस्ट केलेला फोटो प्रचंड व्हायरल होतोय, पाहिलात का?

कृष्णा तेजा सध्या केरळमधील अलाप्पुझा येथे आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तेजा यांनी २०१५ मध्ये यूपीएससी सीएसई उत्तीर्ण केली.

IAS Officer ने पोस्ट केलेला फोटो प्रचंड व्हायरल होतोय, पाहिलात का?
IAS Krishna Teja
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 09, 2022 | 3:59 PM

वृद्धांचे आशीर्वाद सोबत असतील तर लोक मोठ्या उंचीवर जाऊ शकतात, असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत अनेकदा असे दिसून येते की, वृद्ध लोक आपल्यापेक्षा लहान मुलांना आशीर्वाद देतात. कोणत्याही कामगिरीनंतर मोठ्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी अमृत मानले जातात. असाच काहीसा प्रकार एका चित्रात पाहायला मिळाला. आयएएस अधिकारी कृष्णा तेजा यांनी 7 नोव्हेंबर रोजी ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये एक वृद्ध महिला ऑफिसमध्ये बसलेल्या आयएएस अधिकाऱ्याला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहे.

आयएएस कृष्णा तेजा आपल्या खुर्चीवर डोके खाली ठेवून बसले आहेत आणि नम्रतेने त्या वृद्ध महिलेचे प्रेम आणि शुभेच्छा स्वीकारत आहेत.

आयएएस कृष्णा तेजा यांनी हा फोटो ‘तुला #IAmForAlleppey अजून काय हवंय’ अशा कॅप्शनसह शेअर केला आहे.

अवघ्या एका दिवसात हा फोटो 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केला. आणखी एका ट्विटर युझरने लिहिले, “कृष्णा तेजा सर, तुम्ही आज जे आहेत ते तुमच्या नम्रतेमुळे आहात!”

एका तिसऱ्या युझरने म्हटले आहे की, “तुम्हाला अधिक पॉवर मिळू शकेल. “अभिनंदन आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाव्यात अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो”

कृष्णा तेजा सध्या केरळमधील अलाप्पुझा येथे आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तेजा यांनी २०१५ मध्ये यूपीएससी सीएसई उत्तीर्ण केली. कृष्णा तेजा हे मूळचे आंध्रप्रदेशचे आहेत.