AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळा, कॉलेजला सुट्टी, सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा बंद, जम्मू-काश्मीरमधील सरकारचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

शाळा, कॉलेजला सुट्टी, सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा बंद, जम्मू-काश्मीरमधील सरकारचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 05, 2026 | 4:21 PM
Share

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या संताप आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चौथ्या दिवशीही प्रशासनाने कडक खबरदारीचे उपाय कायम ठेवले आहेत. संभाव्य अशांतता रोखण्यासाठी 5 मार्च रोजीही काश्मीर खोऱ्यातील अनेक संवेदनशील भागांमध्ये निर्बंध लागू ठेवण्यात आले आहेत.

प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिक्षण संस्थांनाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे किमान शनिवार 7 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. University of Kashmir आणि Central University of Kashmir यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांनीही सर्व वर्ग स्थगित केले असून नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

इंटरनेट सेवा बंद

अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी इंटरनेट सेवांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. हाय-स्पीड मोबाईल डेटा सेवा (4G/5G) बंद करण्यात आले असून पोस्टपेड कनेक्शनसाठी इंटरनेटचा वेग 2G पर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. विशेषतः श्रीनगरमधील काही जुन्या शहरात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. श्रीनगरमधील मध्यवर्ती भाग लाल चौक येथे असलेले ऐतिहासिक घंटा घर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. येथील पादचारी आणि वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि निदर्शने पाहायला मिळाली. हजारो लोक श्रीनगरमधील ऐतिहासिक घंटाघर परिसरात जमले आणि या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अमेरिकेचे आणि इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर हत्या प्रकरण दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

जनतेला शांतता राखण्याचे आवाहन

अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी मोठ्या मोर्चांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला कडक निर्बंध लागू करावे लागले. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये धार्मिक नेते आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणमध्ये झालेल्या अमेरिका-इस्रायल हवाई हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच लोकांनी आपला संताप किंवा दु:ख कायदेशीर आणि शांततामय मार्गाने व्यक्त करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...