VIDEO : कितीही पैसे कमवा, पण असे मित्र बनवता येत नाही! वडील ICU मध्ये असताना मित्राने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
आपल्याला अनेक मित्र असतात. पण खरा मित्र आहे हे संकटआल्यावरचं कळतं. एका मित्राला त्याचे वडील आजारी असताना मित्राने केलेली मदत सोसलेले हाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांकडून त्या मित्राचे कौतुक होत आहे.

आयुष्यात पैसा कितीही कमावला, मोठं घर घेतलं, महागडी कार घेतली तरी एक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही.ती म्हणजे संकाटाच्या काळात खंबीरपणे सोबत उभा राहणारा मित्र! मित्राचे वडिल आजारी असताना ICU मध्ये असताना एका मित्राने असं काही केलंय, ज्यामुळे त्याने अनेकांची मने जिंकले आहेत.
या तरूणाचे नाव प्रिन्स आय राजा असं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रिन्सचे वडील रूग्णालयात दाखल असल्यामुळे त्याला संपूर्ण रात्र त्यांच्यासोबत घालवायची होती. मात्र रूग्णालयात वरच्या मजल्यावर जागा उपलब्ध नसल्याने त्याला कारमध्येच रात्र काढावी लागली. ही परिस्थिती पाहून त्याच्या मित्राने सुद्धा त्याच्यासोबत कारमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला त्याने घरी झोप येत नाही, घरात कोणी नाही आणि आपण उशिरा झोपतो. अशी कारणं सांगितली. नंतर अर्ध्या- एकतासाने घरी जाईन, असंही म्हटलं आणि असं करता करतां तो प्रिन्ससोबतच गाडीत झोपून गेला.
व्हिडिओ शेअर करणाऱ्या त्या प्रिन्सचा मित्र दिवसभर काम करून दमलाय हे त्याला माहित होतं, म्हणून प्रिन्स त्याला घरी जायला सांगत होता पण तो काही ऐकला नाही. पाच तासापासून तो आपल्या मित्र प्रिन्ससोबतच गाडीत झोपून राहिला. मित्राची ही साथ पाहून कितीही पैसे कमावले तरी असा मित्र मिळवता येणार नाही अशी भावना प्रिन्सने व्यक्त केली.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रिन्सच्या मित्राचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने तुझ्याकडे अनमोल रत्न असल्याचं म्हटलं आहे , तर दुसऱ्याने तु सर्वात श्रीमंत असल्याची भावना व्यक्त केली. तर एका व्यक्तीने आपल्या आयुष्यात असा मित्र नसल्याची खंत व्यक्त केली. खरंच आनंदाच्या क्षणी सोबत असणारे अनेक जण भेटतात. पण अडचणीच्या वेळी स्वत:चा आराम बाजूला ठेवून आपल्या शेजारी बसणारा मित्र मिळणं हीच खरी श्रीमंती आहे.